Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthडायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे मसाले फायदेशीर

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे मसाले फायदेशीर

Subscribe

डायबिटिसला खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाइल कारणीभूत ठरत आहे. वृद्धांसोबत तरुणही या आजाराला बळी पडत आहेत. तसे तर औषधांच्या साहाय्याने रक्तातील साखरेची लेवल कंट्रोल करता येते, पण अन्नचीही विशेष खबरदारी घ्यावी लागते. अशावेळी घराघरात वापरले जाणारे मसाले डायबिटीस रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात. स्वयंपाकघरात ठेवलेले काही मसाले डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

धणे – धणे डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. तज्ज्ञांच्या मते, धण्यांमध्येआढळणारे इथनॉल ग्लुकोज सिरम कमी करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करते. यासाठी डायबिटिसचे रुग्ण रात्री एक चमचा धणे पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी फ्लीटर करून पितात.

- Advertisement -

लवंग – लवंगामध्ये अँटी- बॅक्टेरियल ,अँटी- फंगल तसेच व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. अनेक पोषक तत्वांनीयुक्त लवंग डायबिटिससाठी फायदेशीर असते. यात असणारे अँटी ऑक्सीडेंट रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवतात.

वेलची – हिरव्या वेलचीमध्ये अँटिबायोटिक्स आणि अँटी ऑक्सीडेंट्स आढळतात. हे सर्व गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, रोज एक चमचा वेलची पावडर खाल्याने डायबिटिसची लक्षणे कमी होऊ शकतात.

- Advertisement -

दालचिनी – दालचिनीचे सेवन केल्याने डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधात चिमूटभर दालचिनी पावडर टाकून पिणे फायदेशीर ठरू शकते.

मेथी – मेथीमध्ये फायबर असते जे शरीरातील कार्बोहायड्रेटचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी उकळवून प्या.

तमालपत्र – फोडणी देण्यासाठी तमालपत्र वापरण्यात येते. स्वयंपाकघरातील हा मसाला रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवण्यास उपयुक्त ठरतो. टाईप – 2 डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठी त्याचा वापर प्रभावी ठरतो.

 

 

 


हेही वाचा : या पदार्थामुळे हाड होतील ठिसूळ

 

- Advertisment -

Manini