Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion High Heels घालताना समस्या येत असल्यास 'या' टीप्स करा फॉलो

High Heels घालताना समस्या येत असल्यास ‘या’ टीप्स करा फॉलो

Subscribe

बहुतांश तरुणींना हाय हिल्स घालण्याची सवय नसते. परंतु तरीही फॅशनचा ट्रेंन्ड फॉलो करण्यासाठी किंवा एखाद्या पार्टीला जाताना हाय हिल्स घातल्या जातात. हाय हिल्स पायाला सुंदर दिसतात पण नंतर ते काढून ठेवल्यानंतर पाय आणि टाचा दुखू लागतात. याच कारणामुळे बहुतांश तरुणींना अनइजी वाटते आणि त्या हाय हिल्स घालणे बंद करतात. अशातच गरजेचे आहे की, खास ओकेजनवेळी हाय हिल्स घालण्यापूर्वी त्याची सवय लावावी. त्यावेळी नक्की कोणत्या टीप्स फॉलो कराव्यात याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (High heels wearing tips)

साइजवर लक्ष द्या
हाय हिल्स कधीच घाईघाईत खरेदी करु नका. ते खरेदी करताना तुम्ही त्याची साइज आणि कंम्फर्ट सुद्धा पहा. पण येथेच बहुतांश महिला चुका करतात. यामुळे तुम्ही जेव्हा हाय हिल्स खरेदी करता तेव्हा त्याची साइज चेक करुन घ्या. या व्यतिरिक्त ते आरामदायी आहेत ना याची खात्री करुन घ्या. नेहमीच उत्तम ब्रँन्डचे हाय हिल्स खरेदी करा.

- Advertisement -

हाय हिल्स घालण्याची सवय हळूहळू लावा
एखाद्या खास इवेंटवेळी हाय हिल्स घालणे मुश्किल होऊ शकते. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स ही कमी होऊ शकतो. अशातच तुम्ही हाय हिल्स घालण्याची सवय हळूहळू लावून घ्या. सुरुवातीला घरच्या घरीच हाय हिल्स घालण्याची प्रॅक्टिस करा.(High heels wearing tips)

- Advertisement -

ब्लॉक हिल्स पासून सुरुवात करा
स्ट्रेट हाय हिल्स घालणे तुमच्यासाठी जोखमिचे ठरु शकते. यामुळे हाय हिल्स घालण्यापूर्वी तुम्ही ब्लॉक हिल्स पासून सवय लावा. त्यानंतर तुम्ही जेव्हा ते घालाल तेव्हा तुम्हाला कंम्फर्टेबल वाटू शकते. यावेळी नेहमीच लक्षात ठेवा की, तुमच्या पायाच्या अंगठ्यावर अधिक जोर पडणार नाही.


हेही वाचा- Women Running Shoes Offer: बेस्ट डिल्स, डिस्काउंटसह रनिंग शूज खरेदी करण्याची संधी

 

- Advertisment -

Manini