Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipथकवा आणि चिडचिड, पेरेंटल बर्नआउटचे संकेत

थकवा आणि चिडचिड, पेरेंटल बर्नआउटचे संकेत

Subscribe

मुलं आयुष्यात आल्यानंतर आनंदाचे वातावरण निर्माण होते. आई-वडील मुलांवर खुप प्रेम, लाड करून त्यांना वाढवतात. परंतु मुलांची अधिक जबाबदारी ही आईवर येते. अशातच महिलेला थकवा, चिडचिडेपणा आणि कधीकधी राग येऊ शकतो. खरंतर दिवसभर कोणत्याही आरामाशिवाय सतत मुलाची काळजी घेणे हे पहिल्यांदाच पालक झालेल्या व्यक्तींसाठी आव्हानात्मक असते. या व्यतिरिक्त आई-वडील आपल्या गरजांकडे हळूहळू दुर्लक्ष करू लागतात.

पेरेंटल बर्नआउटचा अर्थ असा होतो की, शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक रुपात होणारा थकवा. जो प्रत्येकाला पेरेंटिंगच्या दरम्यान जाणवते. यामुळे व्यक्ती भावनात्मक रुपात आपल्या मुलांपासून दूर होऊ लागतात. यामुळे नात्यात थकवा आणि डिप्रेशनचा अनुभव होऊ लागतो. अशा स्थितीत पालक ऐवढे थकतात की, ते मुलांना अवॉइड करू लागतात. त्याचसोबत त्यांना वाटते की, ते मुलांची व्यवस्थितीत काळजी घेत नाहीयेत.

- Advertisement -

‘या’ संकेतांवरुन ओळखा तुम्ही पेरेंटल बर्नआउटच्या स्थितीतून जात आहात

-थकव्याचा अनुभव
बहुतांशवेळा आई-वडील याकडे दुर्लक्ष करतात की, मुलांची काळजी घेण्याचे काम हे कधीच न संपणारे आहे. ज्यामुळे तुम्हाला कधीकधी थकवा जाणवतो. आव्हानात्मक असलेल्या या टास्कला एकट्याने फेस करताना काही भावनात्मक बदल होऊ शकतात.

- Advertisement -

-प्रोत्साहनाची कमतरता
मुलांची काळजी घेताना बहुतांश गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्य लोकांकडून मिळणारी मतं ही द्विधा मनस्थिती निर्माण करते आणि यामुळे कधीकधी चिडचिड होऊ शकते. त्याचसोबत कामात कोणीही मदत करत नसल्याने तुम्ही स्वत: ला डिमोटिवेट करता. तुम्ही स्वत:ला एकटे असल्याचे मानता. जे बर्नआउटचे कारण ठरू शकते.

-स्वत:साठी वेळ न मिळणे
बहुतांश महिलांची अशी तक्रार असते की, त्यांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्यांच्या पालनपोषणात त्या फार व्यस्त होऊन जातात. याच कारणास्तव शरीरात काही पोषक तत्त्वांची कमतरता वाढू लागते. जे काही शारीरिक समस्यांचे कारण ठरू शकते.

-वजन वाढल्याने त्रस्त
मुलांची दिवसभर काळजी घेत राहिल्याने स्वत: कडे लक्ष देता येत नाही. यामुळेच वजनही वाढले जाऊ शकते. लठ्ठपणा वाढल्यास तुम्ही मानसिक रुपात त्रस्त होऊ लागता आणि तुम्हाला एकटे वाटू लागते. त्याचसोबत मुलाच्या जन्मानंतर वाढलेले वजन ही बर्नआउटचे कारण ठरू शकते.

पेरेंटल बर्नआउटपासून असे रहा दूर
-एखाद्याची मदत घेण्यास घाबरू नका
-स्वत:साठी वेळ काढा
-सोशल सर्कल वाढवा


हेही वाचा- तुमची अपूर्ण झोप वाढवू शकतो लठ्ठपणा

- Advertisment -

Manini