घरमहाराष्ट्रराज्य शासनाकडून ट्रेकर्ससाठी खुश खबर; आता ट्रेकिंग होईल आणखी सोपे जाणून घ्या...

राज्य शासनाकडून ट्रेकर्ससाठी खुश खबर; आता ट्रेकिंग होईल आणखी सोपे जाणून घ्या ‘या’ ॲपविषयी

Subscribe

महाराष्ट्र राज्य सरकारने अशाच हौशी ट्रेकर्ससाठी ॲपची सुविधा आणली आहे. हरिश्चंद्रगड अभयारण्य आणि कळसुबाई शिखर यांची संपूर्ण माहिती ॲपमध्ये असणार आहे.

सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाच्या या दिवसांत अनेकांचे बाहेर फिरण्याचे प्लान बनत असतात. अशातच अनेक उत्साही तरुण ट्रेकिंगसाठी वेगवेगळी ठिकाणं शोधात असतात. महाराष्ट्र सुद्धा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळा सुरु झाला की महाराष्ट्राच्या ताठ कण्याला म्हणजेच सह्याद्री पर्वतावर हिरव्या शालूची झूल पसरते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ट्रेक करण्यासाठी ट्रेकर मंडळी फिरत असतात. अशातच महाराष्ट्राबाहेरूनही अनेक मुसाफिर महाराष्ट्र भ्रमण कारण्यासाठी येत असतात. पण काही वेळा ट्रेकिंसाठी गेलेल्या मंडळींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. पण आता महाराष्ट्र राज्य सरकारने अशाच हौशी ट्रेकर्ससाठी ॲपची सुविधा आणली आहे.

हे ही वाचा – आदित्य ठाकरेंनी बांधलेला नाशिकमधील ‘तो’ पूल गेला पाण्यात वाहून

- Advertisement -

ट्रेकिंसाठी निघालेल्या ट्रेकर्सना काही वेळा रस्ता चुकणे त्याचबरोबर काहींचा अपघात होतो अशांना तातडीने मदतीची गरज असते. अश्या काही घटना या आधी सुद्धा घडल्या आहेत. अलीकडेच कळसुबाई शिखरावर पर्यटनासाठी जाणाऱ्या दोन पर्यटकांना अंधारात रस्ता न समजल्याने जीव गमवावा लागला होता. तसेच ऐन पावसाळ्यात अनेक पर्यटक पुरामुळे वेगवेगळ्या जागी अडकले होते. दुर्गम भागात ट्रेकिंसाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या बाबतीत या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी वन्यजीवन विभागाने विशेष खबरदारी सुद्धा घेतली आहे. महाराष्ट्रात ट्रेकिंसाठी प्रामुख्याने कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड या दोन्ही ठिकाणांना ट्रेकर्स विशेष पसंती देत असतात. अनोळखी पर्यटकाला अगदी सहजपणे पर्यटन करता यावे त्याचसोबत ट्रेकच आनंद घेता यावा यासाठी कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

हे ही वाचा –   भूस्खलनामुळे ब्रह्मगिरी परिसरातील गावांचे पुनर्वसन विचाराधीन

- Advertisement -

फक्त राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातूनच मुसाफिर या परिसरात येत असतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वन्यजीव विभाग यासाठी मोबाइल ॲपची निर्मिती करणार आहे. या ॲपद्वारे पर्यटकांना अभयारण्यात मार्ग शोधणे, हेल्पलाइन ब्लॅक स्पॉट, हॉटेल्स आणि ट्रेकिंगची माहिती मिळविण्यासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हे ही वाचा –  नाशिक महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन : मनविसे

कळसुबाई शिखर

महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वाधिक ऊंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराची ओळख आहे. कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्यातील अकोला तालुक्यात आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची जमिनीपासून ५४०० फुट आहे. अनेक ट्रेकर्सना हे शिखर ट्रेकिंग साठी खुणावत असतं.

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगडला सुद्धा अनेक ट्रेकर्स विशेष पासनाटी देत असतात. हरिश्चंद्रगड अहमदनगर मधील अकोल्यात आहे. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून ४६७० फूट उंच आहे. हा गड चढत असताना घनदाट अभयारण्यातून जावे लागते. या जंगलात अनेक नैसर्गिक वनस्पती सुद्धा आहेत. हरिश्चंद्रगडचा ट्रेक रोमांचक असतो. पावसाळ्यात अनेक ट्रेकर्स या गडाला विशेष पसंती देतात.

हे ही वाचा –  गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी ४०० कोटींचा आराखडा सादर

ॲपविषयी माहिती

ॲपमध्ये हरिश्चंद्रगड अभयारण्य आणि कळसुबाई शिखर यांची संपूर्ण माहिती ॲपमध्ये असणार आहे. अभ्यारण्यात मार्ग शोधणे, हेल्पलाईन ब्लॅक स्पॉट, पर्यटनस्थळे, जैवविविधता, नियमावली, हॉटेल्सची उपलब्धता, आणि एकूणच ट्रेकिंगची माहिती उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर गड, किल्ले आणि इतर मार्गांचे तीन गटांत वर्गीकरण सुद्धा करण्यात आले आहे. सर्वात महतवाचे म्हणजे, खडतर मार्गासाठी लाल, माध्यम मार्गासाठी पिवळा आणि सोप्या मार्गासाठी हिरवा रंग अशी सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर लहान पायवाटा आणि अवघड मार्ग यांची माहिती देणारी यंत्रणा सुद्धा ॲप यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचसोबत परिसरातील गाईड , विविध आपत्कालीन पोलीस आणि स्थानिकांचे संपर्क तसेच हेल्पलाइन नंबर सुद्धा यामध्ये समाविष्ट असतील.

हे ही वाचा –  सेल्फीसाठी जीव गेला तरी बेहत्तर; पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी सुरूच

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -