घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी..., काय म्हणाले...

Lok Sabha 2024 : विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी…, काय म्हणाले सत्यजीत तांबे?

Subscribe

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांनी एका प्रचारसभेत सांगलीचा उमेदवार जाहीर केला, आणि मविआत ठिणगी पडली. सांगलीत काँग्रेसकडून बंडखोरी झाली. बंडखोर विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आता काही तासांवर आले आहे. मात्र, अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर टप्प्यांसाठीचा जागांचा तिढा सुटलेला नाही. मविआत तर अनेक जागांसाठी कुरबुरी सुरू आहेत. यातलीच एक जागा म्हणजे सांगलीची जागा. उद्धव ठाकरे यांनी एका प्रचारसभेत सांगलीचा उमेदवार जाहीर केला, आणि मविआत ठिणगी पडली. सांगलीत काँग्रेसकडून बंडखोरी झाली. बंडखोर विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. (Lok Sabha Election 2024 satyajeet tambe reaction over vishal patil will contest sangli lok sabha election)

उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. तरीही ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले अद्यापही आग्रही आहेत. यामुळेच ठाकरे गटाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे. आणि अशातच सांगलीत काँग्रेसकडून बंडखोरी झाली. बंडखोर विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अर्जासोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. तर पाटील यांनी एक काँग्रेस आणि एक अपक्ष असे दोन फॉर्म भरले. यामुळे या दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. आता पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मतभेद झाल्यानेच सत्यजीत तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. आता तांबे यांनी विशाल पाटील यांना समर्थन देणारी एक पोस्टच एक्स या सोशल मीडिया साईटवर केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election : शरद पवारही बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज दाखल करणार

सत्यजीत तांबेंच्या पोस्टमध्ये काय?

सत्यजीत तांबे यांनी एक्सवर पोस्ट करत विशाल पाटील यांना एक संधी नक्कीच मिळायला हवी असे म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये तांबे म्हणतात की, विशाल पाटील यांच्यावर काय अन्याय झाला आहे, हे फक्त त्यांचा संघर्ष माहिती असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशाल पाटलांना संधील मिळायलाच हवी, असेही सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 satyajeet tambe reaction over vishal patil will contest sangli lok sabha election)

- Advertisement -

वसंतदादा पाटील यांचे या महाराष्ट्रावर आणि आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजिनियर तयार होत आहेत. विशाल पाटील हे वसंत दादांच्या कामाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, असं तांबे सांगतात.

दरम्यान, ठाकरे गटाने उमेदवार मागे घेतल्यास काँग्रेसचा एबी फॉर्म विशाल पाटील यांच्यासाठी तयार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच दिली आहे. मात्र, ठाकरे गटाने ती जागा लढवायचीच असे ठरवले असल्याने आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. ठाकरे गटाने निर्णय बदलला नाही आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिली, तर विशाल पाटील यांना आम्ही समजावून माघार घ्यायला सांगू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, बंडखोरी करणाऱ्यांची पक्षाने हकालपट्टी करावी, अशी मागणी आता उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी विशाल पाटील यांचे नाव न घेता केली आहे. (Lok Sabha Election 2024 satyajeet tambe reaction over vishal patil will contest sangli lok sabha election)

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला? निलेश राणेंचे सूचक वक्तव्य


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -