घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : भाजपा राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा...

Devendra Fadnavis : भाजपा राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Subscribe

भारतीय जनता पक्ष जोपर्यंत आहे, तोपर्यंत घटनेला कोणाला हात लावू देणार  आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे, असा विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच भाजपाच्या काही नेत्यांकडूनही घटना बदलण्यासाठी 400 जागा जिंकायच्या आहे, असे वक्तव्य करण्यात येत आहे. असे असले तरी भारतीय जनता पक्ष जोपर्यंत आहे, तोपर्यंत राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. (BJP will not allow anyone to touch the Constitution Devendra Fadnavis)

घटनेत बदल करण्याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण काय बोलतो हे मला माहीत नाही, पण या देशाचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. मोदींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मला गीता, कुराण, बायबलपेक्षाही देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे. देशाची राज्यघटना आहे, म्हणून चहा विकणार मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे. कुठलीही निवडणूक आली की, काँग्रेस आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावाले घटना बदलणार अशाप्रकारचा आरोप करतात. पण 10 वर्षं पूर्ण बहुतम मोदींकडे होतं. त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, तोपर्यंत राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : द्रौपदीबाबत केलेल्या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंकडून संताप

लोकसभा निवडणुकीबाबत बोलतना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामती, सांगली किंवा सातारा या तिन्ही ठिकाणी आम्ही उद्या अर्ज दाखल करत आहोत. मी यापूर्वी देखील सांगितलं आहे की, ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई आहे. ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात आहे. त्यामुळे जनता मोदींसोबतच राहील. ज्या उमेदवारांना मत दिल्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, ज्यांना मत दिल्यामुळे मोदींची संख्या वाढले, त्यांना लोक मत देतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

विरोधकांचा आरोप काय? (What is the opposition’s accusation?)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने भ्रष्टाचारावर भर दिला आहे. तर, दुसरीकडे भाजपाला राज्यघटना बदलायची आहे, हा मुद्दा विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ने लावून धरला आहे. कारण महाराष्ट्राच्या बीडमधील भाजपा उमेदवार पंकजा मुडे, राजस्थानमधील भाजपा उमेदवार ज्योती मिर्धा, फैजाबाद अयोध्या लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांनी संविधानाबद्दल वक्तव्य केले आहे. भाजपाला संविधानात बदल करायचा असून त्यासाठी संसदेत मोठे बहुमत आवश्यक असल्याचे या सर्वांनी जाहीररीत्या म्हटले आहे. यामुळेच विरोधक आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा – Lok Sabha Election : शरद पवारही बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज दाखल करणार

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -