Friday, May 3, 2024
घरमानिनीHealthपावसाळ्यात Cholera पासून असा करा बचाव

पावसाळ्यात Cholera पासून असा करा बचाव

Subscribe

पावसाळ्यात दमट हवामानामुळे साथीचे आजार वाढले जातात. जसे की, बॅक्टेरिया, फंगस, यीस्ट, मॉल्ड सारखे आजार वेगाने वाढले जातात. त्यापैकीच एक म्हणजे-वी कॉलरी बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया जेव्हा व्यक्तीच्या शरिरात जातो तेव्हा आतड्यांमध्ये ऐवढ्या झपाट्याने वाढतो की, काही तासांमध्ये व्यक्तीच्या शरिरातील सर्व पाणी शोषले जाते. या आजाराला कॉलरा किंवा हैजा असे म्हटले जाते. या आजाराकडे दुर्लक्ष केले तर रुग्णाचा मृत्यू सुद्धा होतो.

कॉलराचे बॅक्टेरिया खासकरुन दुषित पाण्यात असतो. तसेच काही सीफूड, कच्ची फळं आणि भाज्यांमध्ये सुद्धा असतो. या गोष्टींच्या माध्यमातून हा बॅक्टेरिया कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्तीच्या शरिरात प्रवेश करतो. आतड्यांमध्ये गेल्यानंतर तो शरिराला संक्रमित करतो. तर घाण ज्या ठिकाणी असते तेथे हैजाचा अधिक फैलाव होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

बहुतांश लोकांमध्ये हैजा बॅक्टेरिया आतड्यात गेल्यानंतर त्याबद्दल लगेच कळत नाही. या बॅक्टेरियाची लक्षण 7-14 दिवसांमध्ये दिसून येतात. हैजाची लक्षणं पुढीलप्रमाणे:
– डिहाइड्रेशन
-थकवा आणि अधिक चिडचिड होणे
-अधिक तहान लागणे

- Advertisement -

कसा बचाव कराल?
-पावसाळ्यात घरात स्वच्छता, सॅनिटाइजेशन केल्याने कॉलरा नियंत्रित केला जाऊ शकतो
-शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यावे
-हात अस्वच्छ झाल्यानंतर ते व्यवस्थितीत साबणाने धुवावेत
-पाणी खुप वेळ उघडे ठेवले असेल तर ते पिऊ नये
-पाणी गरम करुन प्यावे
-जेवण व्यवस्थितीत गरम करुन खावे
-कापलेली किंवा अधिक शिजवलेली फळं अजिबात खाऊ नयेत

- Advertisment -

Manini