पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचविण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचविण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

पावसाळा ऋतू सर्वांच्या आवडीचा असतो. हा ऋतू आनंद घेऊन येणारा असतो. पण याच पावसाळ्यात काही गोष्टी मात्र त्रासदायक ठरू शकतात. पावसाळ्यात आपण आपल्या स्वचतेकडे लक्ष देतो त्याच प्रमाणे पावसाळा सुरु झाला की स्वयंपाक घराकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वातावरण दमट असते. त्यामुळे अन्नपदार्थ हे ओलाव्याने लवकर खराब होण्याची शक्यता असते. यात साखरेचा समावेश सुद्धा असतो. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे साखरेला चिकटपणा येतो साखर ओली सुद्धा होते. त्यामुळे साखर खराब होऊन त्याला मुंग्या सुद्धा लागतात. त्यामुळे साखर टाकून द्यावी लागते. अशी साखर वापराता येत नाहीत. त्यामुळेच पावसाळ्यात साखर ओली आणि चिकट होण्यापासून वाचविण्यासाठी ‘या’ काही टीप्स तुमच्या नक्की उपयोगी पडतील.

आणखी वाचा –  फ्रीजमधून येत असेल दुर्गंधी तर वापरा ‘या’ टिप्स

आणखी वाचा – Be careful : ‘फ्रुट शेक’ पिणे किती फायदेशीर? वाचा काय सांगतं ‘आयुर्वेद’

 

साखरेसोबत लवंग सुद्धा ठेवा –

 

ओलाव्यापासून साखरेला वाचविण्यासाठी साखरेच्या डब्यात सात ते आठ लवंग ठेवा. त्यामुळे साखरेला ओलावा येणार आणि आणि मुंग्याही लागणार नाहीत. लवंगाला एक प्रकारचा उग्र वास असतो त्यामुळे लवंग जर साखरेच्या डब्यात ठेवली तर मुंग्या सुद्धा लागणार नाहीत.

आणखी वाचा – पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

साखरेसोबत तांदूळ सुद्धा ठेवा –

साखरेतील ओलावा टाळण्यासाठी एका कापडात तांदूळ बांधून ते साखरेच्या डब्यात ठेवा. तांदूळ साखरेत ओलावा शोषून घेतील आणि त्यामुळे साखरेमधील ओलावा कमी होईल आणि साखर वर्णिला चिकटणार सुद्धा नाही.

 

साखर काचेच्या भांड्यात ठेवा –

बहुतेक जण साखर किंवा घरातील इतर अन्नपदार्थ हे प्लास्टिकच्या भांड्यात ठेवण्यास प्राधान्य देतात. पण प्लास्टिकच्या भांडयात ठेवलेले अन्नपदार्थ किंवा साखर पावसाळा सुरु होण्यापूर्वी काचेच्या बरणीत किंवा भांड्यात भरून ठेवावेत. पावसाळ्यात साखर काचेच्या बरणीत ठेवल्याने मुंग्या येण्याची समस्या सुद्धा दूर होईल.

आणखी वाचा –  दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का, काय सांगतं आयुर्वेद?

 

त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी स्वयंपाक घरातील काही पदार्थांकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यामुळे अन्नपदार्थ खराब होणार नाहीत.

 

 

 

 

 

First Published on: July 2, 2022 3:59 PM
Exit mobile version