फ्रीजमधून येत असेल दुर्गंधी तर वापरा ‘या’ टिप्स

सतत फ्रिज उघडताना तुम्हाला आतून उग्र, दर्प वास येत असेल तर तुम्ही वैतागता. अनेक प्रयत्न करूनही हा वास जात नाही. त्यामुळे तुमच्या फ्रिजमधून येणारा वास चुटकीसरशी घालवायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही सोपे टीप्स देऊ.

फ्रीज (Fridge) हा गृहिणींच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. भाजी, उरलेले अन्न, तापवलेले दूध, चिकन आदी विविध पदार्थ ठेवण्यासाठी आपण फ्रिजचा वापर करतो. त्यामुळे दिवसभरात असंख्यवेळा ज्या फ्रिजचा वापर केला जातो त्याची निगा राखणेही गरजेचं आहे. सतत फ्रीज उघडताना तुम्हाला आतून उग्र, दर्प वास (Smell) येत असेल तर तुम्ही वैतागता. अनेक प्रयत्न करूनही हा वास जात नाही. त्यामुळे तुमच्या फ्रीजमधून येणारा वास चुटकीसरशी घालवायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही सोपे टीप्स देऊ. त्या टीप्सचा वापर करून तुम्ही तुमचा फ्रिज दुर्गंधीयुक्त करू शकाल. (Tips for reduce smell from fridge)

हेही वाचा – पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

या टिप्स वापरा आणि तुमचा फ्रिज दुर्गंधीमुक्त ठेवा

 • फ्रीजच्या प्रत्येक रॅकमध्ये सुखी कॉफी ठेवल्यास २ ते ३ दिवसांत वास दूर होतो.
 • फ्रीजच्या मध्यभागी बेकिंग सोडा ठेवल्यास काहीच वेळात वास दूर होतो.
 • अॅप्पल विनेगारला पाण्यात गरम करून ठेवल्यास फ्रीजमधील वास येणं बंद होतं.
 • फ्रीज स्वच्छ करताना फ्रीजमधील स्लाईड्स लिंबूने स्वच्छ केल्यास वासापासून सुटका मिळू शकेल.
 • लिंबू कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास येत नाही.
 • फ्रीजच्या रॅकवर शीट लावून ठेवणे. प्रत्येक आठवड्याला फ्रीजची स्वच्छता करणे.

हेही वाचा – चिंचेच्या पानांचा चहा कधी प्यायला आहे का ? ‘हे’ आहेत फायदे

हे लक्षात ठेवा

 • कापलेला लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे फ्रीजमध्ये दुर्गंधी पसरते.
 • फ्रीजमध्ये ठेवताना सर्व खाद्यपदार्थ बंद डब्यात ठेवल्याने दुर्गंधी पसरत नाही.
 • साफ केल्यावर फ्रिजमधून वास येत असेल तर फ्रीज व्हिनेगरने साफ करा.

हेही वाचा – दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का, काय सांगतं आयुर्वेद?

याची काळजी घ्या

 • अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त वस्तू फ्रीजमध्ये भरल्या जातात. ते टाळलं पाहिजेत.
 • सर्व वस्तू उचलून आपण थेट फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे फ्रीजला दुर्गंधी येऊ शकते.
 • फ्रीजमध्ये उपलब्ध जागेत जास्तीत-जास्त सामान ठेवण्याचा प्रयत्न करणं चुकीचे नाही, पण वस्तू अलगदपणे ठेवता आणि काढता येतील, इतकेच साहित्य त्यात ठेवावं. म्हणजेच फ्रिज ओव्हरलोड होत नाही.