घरताज्या घडामोडीKonkan Railway : तिकीट आरक्षणात कोणताही काळाबाजार नाही - मध्य रेल्वे

Konkan Railway : तिकीट आरक्षणात कोणताही काळाबाजार नाही – मध्य रेल्वे

Subscribe

कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. यंदा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसांचे म्हणजेच १७ सप्टेंबरची कोकण रेल्वेच्या गाड्यांची तिकीटं एका मिनिटांत बुक झाली. अवघ्या मिनिटांमध्ये हे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. यंदा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसांचे म्हणजेच १७ सप्टेंबरची कोकण रेल्वेच्या गाड्यांची तिकीटं एका मिनिटांत बुक झाली. अवघ्या मिनिटांमध्ये हे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ‘रेल्वेच्या तिकीट आरक्षणात कोणताही कुठलाही काळाबाजार नाही, कोणाचा हस्तक्षेप नाही’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपूरे यांनी सांगितले. (Konkan Railway No Black Market in Ticket Reservation Central Railway)

नेमकं काय म्हणाले डॉ. शिवराज मानसपूरे?

- Advertisement -

“प्रवाशांनीच रेल्वेच्या तिकीट बुक केलेल्या आहेत. यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नाही. कुठलाही काळाबाजार नाही. याप्रकरणी मध्य रेल्वेचे आरपीएफ, खासगी विभागामार्फत वारंवार तिकिट काऊंटरवर चौकशी केली जाते. त्यामध्ये सॉफ्टवेअरपासून सर्व वस्तुंची तपासणी केली जाते. त्यामुळे आक्षेपार्ह कुठेच नाही”, असे डॉ. शिवराज मानसपूरे यांनी सांगितले.

याशिवाय, “ज्या प्रवाशांना तिकीट मिळालेल्या नाहीत. त्या प्रवाशांनी काळजी करू नये, कारण मध्य रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. त्यावेळी नव्याने तिकीट आरक्षण सुरू केले जाणार आहे”, असेही डॉ. शिवराज मानसपूरे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे कोकण रेल्वेच्या सर्व तिकीट बुक झाल्याबाबत सर्वपक्षीय नेतेमंडळी रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे मंत्रालयाच्या भेटी घेणार आहेत. तर, दुसरीकडे प्रवाशांनीच रेल्वेच्या तिकीट बुक केल्या असून यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नाही. कुठलाही काळाबाजार नाही’, असे मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – कोकण रेल्वे : तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -