Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthडेट नसताना अचानक पिरियड आलेत, असे हॅण्डल करा टेन्शन

डेट नसताना अचानक पिरियड आलेत, असे हॅण्डल करा टेन्शन

Subscribe

प्रत्येक महिलेला मेंस्ट्रुअल सायकल मधून जावे लागते. अशातच कधीकधी हार्मोनल बदलामुळे आपले पीरियड्स पुढे-मागे होतात. मात्र जर पीरियड्सची डेट नसताना सुद्धा ते आल्यानंतर टेंन्शन येते. त्याचवेळी तुम्ही सार्वजिक ठिकाणी असाल तर आणखी पंचायत होते. यावेळी घाबरुन न जाता पुढील काही ट्रिक्सने ही स्थिती तुम्ही हॅण्डल करु शकता. (Period leak situation)

- Advertisement -

-नेहमीच लक्षात ठेवा की, पीरियड लीकचा व्यक्तिमत्त्वावर काही परिणाम होच नाही. अशातच अचानक पीरियड्स आल्यानंतर लगेच घाबरु नका.

-जर तुमच्याकडे जॅकेट, कोट किंवा अन्य कवर-अप असेल तर त्याचा वापर तुम्ही पीरियड्सचा डाग हटवण्यासाठी केला जाऊ शकतो.

- Advertisement -

-अचानक पीरियड्स आल्यानंतर तुमच्या आसपास असलेल्या एखाद्या रेस्टरुम किंवा वॉशरुमध्ये जा.

-नेहमीच तुमच्या बॅगेत एक सॅनेटरी पॅड आणि पँन्टी ठेवा. जेणेकरुन अशी स्थिती निर्माण झाल्यास तुम्ही त्याचा वापर करु शकता.

या व्यतिरिक्त तुम्ही सॅनिटरी पॅडला शाश्वत पर्याय म्हणून मेंस्ट्रुअल कपचा वापर करु शकता. हा कप रबर आणि सिलिकॉन पासून तयार करण्यात आलेला असतो. मेंस्ट्रुअल कप वापरल्यास त्याच्यामधून पीरियड लीकेज होण्याची शक्यता फार कमी असते. हा कप तुम्ही 8-10 तासांदरम्यान रिकामा करुन पुन्हा वापरु शकता.

तसेच जर तुमचा ब्लड फ्लो पीरियड्स दरम्यान अधिक असेल तर लांब आणि जाड आकाराचे पॅड्स वापरा. मार्केटमध्ये तुम्हाला असे पॅड्स सहज मिळतील.


हेही वाचा- Vagina स्वच्छ करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करणे टाळा

- Advertisment -

Manini