घरक्राइमPune crime : 'त्या' दहशतवाद्यांनी केला होता सातारा, कोल्हापुरात बॉम्ब फोडण्याचा सराव

Pune crime : ‘त्या’ दहशतवाद्यांनी केला होता सातारा, कोल्हापुरात बॉम्ब फोडण्याचा सराव

Subscribe

मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने ताब्यात घेतले होते.

पुणे : मागील सोमवारी पुण्यातून ताब्यात घेऊन दोन दहशतवाद्यानी पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी निर्जनस्थळी बॉम्ब स्फोट करण्याचा सराव केला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न एटीएसने उधळून लावण्यात ताब्यात घेतले आहे. सध्या ते एटीएस कोठडीत असून, एटीएसकडून त्या दहशतवाद्याची चौकशी केली जात आहे. या चौकशीतूनच आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. तो सध्याही फरार असून,त्याच्या शोधासाठी पथक गठीत करण्यात आली आहेत.

- Advertisement -

कोंढव्यातील घरातून मिळालेले संशयास्पद साहित्य
पुण्यातील कोथरुड भागातून ताब्यात घेतलेल्या मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युसुफ या दोघांनी पोलिसांना खोटी माहिती दिली. यावरुन संशय आल्याने पोलिसांनी त्यांचे मोबाइल नंबर ट्रू कॉलरवर टाकली असता त्यांची नावे वेगळीच आली. त्यानंतर ते राहत असलेल्या कोंढव्यातील घरात जाऊन तपास केला असता इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याच समोर आले. त्यांच्याकडे महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य आढळून आले ते सगळे साहित्य फॉरेन्सिक लॅबरॉट्रीकडे तपासासाठी पाठविण्यात आले आहे.

दीड वर्षापासून होते पुण्यात वास्तव्यास
मागील सोमवारी ताब्यात घेतलेल्या घेतलेल्या मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युसुफ हे दोघेही बनावट नावाने गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. मात्र, मागील सोमवारी ते दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असताना त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

फरार मोहम्मद शहनाज आलमवर आहे पाच लाखाचे बक्षीस
दोन दहशतवाद्याना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा फरार होण्यात यशस्वी झाला. तो एनआयएच्या हिट लिस्टवर असून, त्याच्यावर एनआयएने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे.

हेही वाचा : मणिपूरवरुन काँग्रेस आणणार मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव, लोकसभेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित

जोधपूरमध्ये फसला होता बॉम्ब स्फोटाचा प्रयत्न
सध्या एटीएसच्या कोठडीत असलेल्या दोन दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून या तिघांनी याआधी राजस्थानमधील जयपूर येथे बॉम्बस्फोट करण्याच प्रयत्न केला होता. त्यांचा तो प्रयत्न फसल्यानंतर हे तिघेने पुण्यात आले होते.

वनविभागासह पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह
मागील दीड वर्षापासून पुण्यात वास्तव्यास असलेल्या एक फरार आणि दोन ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यानी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील जंगलात जाऊन बॉम्ब फोडण्याचा सराव केला होता. तेव्हा जंगलात संशयास्पद फिरणे स्फोट घडवून आणणे या सगळ्या हालचाली केल्या असताना स्थानिक पोलीस आणि वन विभागाला याची पुसटशी कल्पनाही नसावी यावरुन वनविभागासह पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

आणखी धक्कादायक माहिती येऊन शकते समोर
ताब्यात घेतलेल्या दोन दशहतवाद्यांलाना 25 जुलै रोजी पुण्यातील विशेष न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. महाराष्ट्र एटीएसने 22 जुलै रोजी तपास हाती घेतला आहे. तेव्हा दिवसांत करण्यात येणाऱ्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते हे येणारा काळ सांगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -