Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthपिरियड्समध्ये खाऊ नयेत हे पदार्थ

पिरियड्समध्ये खाऊ नयेत हे पदार्थ

Subscribe

दर महिन्याचे मासिक पाळीतील ते ५ दिवस कोणत्याही स्त्रीला नकोसे वाटतात. आजकाल बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक स्त्रिया या PCOD आणि PCOS सारख्या समस्यांमधून जात आहेत. यामध्ये मासिक पाळीमध्ये मूड बदलणे, चीडचड होणे अशा प्रकारच्या समस्या देखील महिलांना जाणवतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या दिवसात पौष्टीक खाणे फायदयाचे असते. यात प्रत्येक महिलेने भरपूर भाज्या, भाज्या अवश्य खायला हव्यात. यासोबतच साखर आणि मीठ खाणे टाळले पाहिजे. तसेच तळलेले पदार्थ, जंक फूड खाणेंही टाळले पाहिजे. फ्रिजमधून बाहेर काढल्या-काढल्या थंड पाणी पिऊ नये. या ५ दिवसात पोटात दुखत असले तर कोमट पाणी प्यावे याने तुम्हाला बराच आराम मिळेल. अनेकांचा असा समज आहे की, या दिवसात चहा कॉफी घ्यावे पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. याने समस्या अधिक जाणवू लागतात.

- Advertisement -

4 Nutritious Breakfast Recipes to Have During Periods | Sofy

‘ही’ फळे मासिक पाळीत चुकूनही खाऊ नयेत –

- Advertisement -

मासिक पाळी दरम्यान संत्री, गोड लिंबू यांसारखी आंबट फळे खाऊ नयेत. कारण याने तुमचे क्रॅम्प्स वाढू शकतात. तसेच दही, रायता यांपासून बनविनलेले पदार्थ देखील खाऊ नयेत.

कोणती फळे खाऊ शकता –
मासिक पाळीदरम्यान आंबा, डाळींब, सफरचंद खाऊ शकता. पण लक्षात ठेवा रिकाम्या पोटी ही फळे खाऊ नयेत .याने तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. यादिवसात तुम्ही डार्क चॉकलेटही खाऊ शकता.

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी काय खावे?

1.सकाळी २ खजूर रिकाम्या पोटी खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. यानंतर ‘ग्रीन टी’ पिऊ शकता.

2.दुपारी १२ वाजता कोणतेही फळ खाऊ शकता.

3.दुपारच्या जेवणात भात, चपाती यांसारखे पदार्थ खाऊ शकता किंवा प्लेन सलाडही उत्तम ऑप्शन आहे.

4.तळलेले मखाना सुद्धा संध्याकाळी खाऊ शकता आणि रात्री जेवताना दही आणि खिचडी खाऊ शकता.

 


हेही वाचा ; थंडीत घामाच्या दुर्गंधीवर करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini