घरलाईफस्टाईलPets : पाळीव प्राण्यांपासून रोगाचा धोका?, एका संशोधनात खुलासा

Pets : पाळीव प्राण्यांपासून रोगाचा धोका?, एका संशोधनात खुलासा

Subscribe

अलिकडे पाळीव प्राण्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषत: कुत्रा आणि मांजर पाळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तुमच्या घरी असणाऱ्या पाळीव प्राण्याला तुम्ही जीवापाड जपता? त्याची योग्य काळजी त्याला हवं नको ते कायम पाहता? बरोबर ना? तुमच्या चार पायांच्या दोस्तांच्या आरोग्यासाठी तुम्ही कायम काहीना काही करता, पण बऱ्याचदा पाळीव प्राण्यांमुळे नकळतपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पाळीव प्राणी पाळल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे. कुत्रा आणि मांजर या सारखे पाळीव प्राणी मानवाच्या जास्त संपर्कात असतात, त्यामुळे यांच्यामार्फत आजार पसरण्याचा धोका जास्त असतो.

पाळीव प्राणी पाळणारे भारतीय लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता, त्यांचे रोग आणि त्यांच्यावर आढळणारे विषाणू यांच्याबाबत खूप जागरूक असतात. पण जेव्हा पाळीव प्राणी आणि घराची दैनंदिन साफसफाईचा प्रश्न येतो, तेव्हा चारपैकी फक्त एक भारतीय याकडे प्राधान्याने पाहतो. त्यामुळे अनेकवेळा पाळीव प्राणी आधी आजारी पडतात आणि त्यानंतर हा आजार माणसात पसरतो, असं संशोधनात समोर आलं आहे.

- Advertisement -

एका संशोधन अहवालानुसार, प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंद्वारे संसर्गजन्य रोग माणसांमध्ये पसरतात. या संशोधनाच्या अहवालानुसार, बॅसिलस अँथ्रेसिस हा एक प्रकारचा जीवाणू आहे, जो प्राण्यांमध्ये घातक रोग पसरवतो.
त्यामुळे प्राण्यांमध्ये अँथ्रॅक्स नावाचा आजार पसरतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजाराची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात माणूस आल्यास हा आजार माणसालाही होतो. या संशोधनात पाळीव प्राण्यांचे केस, कोंडा आणि त्वचेच्या कणांवर संशोधन करण्यात आलं आहे. पाळीव प्राण्यांचे केस, कोंडा यामुळे प्राण्यांचे मालक आणि पाळीव प्राण्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लहान मुलांमध्ये ऍलर्जी होण्याचा धोकाही संभवतो.

कोणते आजार उद्भवू शकतात?

  • प्राण्यांच्या केसात पिसवा किंवा गोचीड यासारख्या परजीवी किटकांमुळे मानवी त्वचेला हानी होऊ शकते. श्वसनामार्गे ते शरीरात गेल्यानं श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या नखांमध्ये आणि पंजामध्ये बुरशी होण्याचं प्रमाण जास्त असतं. ते आपल्या पोटात गेल्यास आपल्याला पोटाचे विकार किंवा जंतुसंसर्ग होऊ शकतो.
  • प्राण्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात, जे हवेमुळे उडून आपल्या किंवा लहान मुलांच्या शरीरात प्रवेश जातात. त्यामुळे अस्थमा होण्याची शक्यता असते.
  • प्राण्यांपासून होणाऱ्या आजारांचा सर्वात जास्त धोका हा गरोदर महिलेला, लहान मुलांना आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या लोकांना असतो. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

प्राण्यांना व्हेटरनरी डॉक्टर्सकडे नियमित न्या

  • तुमच्या पाळीव प्राण्यांना कोणताही त्रास होत नसला तरी वर्षातून किमान एकदा त्यांना पशुवैद्यकाकडे न्यायला हवं, त्यांची तपासणी करून घ्यायला हवी.
  • या भेटीत प्राण्यांच्या आरोग्यासाठी मूलभूत असलेल्या दोन गोष्टी आवर्जून करायला हव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्राण्यांचं लसीकरण रेकॉर्ड अद्ययावत करणे.
  • आता यामध्ये आपण कुत्रे आणि मांजर हेच मुख्य पाळीव प्राणी आहेत, असं गृहीत धरलं तर सगळ्यांत महत्त्वाची आहे रेबीज विरुद्धची लस. विषाणूमुळे होणाऱ्या या रोगामध्ये मृत्यूदर हा जवळपास 100% आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -