घरदेश-विदेशTexas: कॅन्सर नसतानाही डॉक्टरांनी महिलेला दिली केमोथेरपी; वाचा पुढे काय झालं?

Texas: कॅन्सर नसतानाही डॉक्टरांनी महिलेला दिली केमोथेरपी; वाचा पुढे काय झालं?

Subscribe

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रेफर केलेल्या लिसाने मार्चमध्ये केमोथेरपी सुरू केली. उपचारांमुळे खूप नुकसान झाले, तिचे केस गळत होते आणि शरीर कमजोर झाले, पण दुसऱ्या फेरीत काही आठवड्यांनंतर आलेल्या रिपोर्टनंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. लिसाला कॅन्सरच नसल्याचं निष्पन्न झालं

नवी दिल्ली: टेक्सासमधील दोन मुलांची आई एक भयानक अग्निपरीक्षा सहन केल्यानंतर बरी होत आहे. 39 वर्षीय लिसा मोंक हिला 2023 च्या सुरुवातीला रक्ताच्या कॅन्सरचे दुर्मिळ स्वरूपाचे निदान झाले होते. द न्यूयॉर्क पोस्टच्या मते, लिसाला अतिशय वेदनादायी असे केमोथेरपी उपचार घ्यावे लागले. मात्र, त्या उपचारानंतर अवघ्या काही आठवड्यांतच एक धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. जो कॅन्सर बरा होण्यासाठी लिसा वेदनादायी उपचार घेत होती, त्या लिसाला कर्करोग झालाच नव्हता. (Texas Doctors Give Chemotherapy to Woman Without Cancer Read what happened next)

या सगळ्याची सुरुवात अशी झाली की, लिसाला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्याबाबतीत उपचारासाठी डॉक्टरांकडे गेलं असता, केलेल्या स्कॅनमध्ये तिच्या प्लीहामध्ये (Spleen) पाणी झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे पुढच्या अनेक टेस्ट करण्यास डॉक्टरांनी सुचवलं. त्याप्रमाणे अनेक चाचण्या करण्यात आल्या या केलेल्या टेस्टमधून लिसाला प्राणघातक ब्लड कॅन्सर असल्याचं सांगण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार, लिसाने तिच्या प्रियजनांना पत्रे लिहिली होती. कारण, तिला भीती होती की तिचं आयुष्य हे आता काही क्षणांचंच आहे.

- Advertisement -

लिसाला याबाबत विचारलं असता ती म्हणते की, “जेव्हा डॉक्टरांनी मला कर्करोग असल्याचे सांगितले तेव्हा मला धक्का बसला. मला सांगितलं गेलं की कॅन्सर प्राणघातक आहे.” लिसा म्हणाली, मला घरी जाऊन माझ्या दोन मुलांना मला कॅन्सर असल्याचं सांगावं लागलं. पण मी यातूनही लढण्याचा प्रयत्न करत होते.

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रेफर केलेल्या लिसाला मार्चमध्ये केमोथेरपी सुरू करण्यात आली. घेतलेल्या केमोथेरपीमुळे लिसाचे खूप नुकसान झाले. तिचे केस गळू लागले होते आणि शरीर कमजोर होत होते.

- Advertisement -

हे सगळं सुरू होतं. लिसा केमो घेत होती आणि त्याने होणाऱ्या वेदना मुकट्यानं सहन करत होती, मात्र अचानक एके दिवशी पुन्हा एकदा तिच आयुष्यच पूर्णपणे बदललं. तिचा पॅथॉलॉजीचा जो रिपोर्ट आला होता, त्याचा फेरआढावा घेण्यात आला. या फेरआढाव्यात आधीच्या रिपोर्टमध्ये झालेली एक गंभीर त्रुटी उघड झाली आणि लिसा जी मागच्या अनेक आठवड्यांपासून आपल्याला प्राणघातक कॅन्सर असल्याचं समजून आयुष्य जगत होती, तिला कोणत्याही प्रकारचा कॅन्सर नसल्याचं निष्पन्न झालं.

ही बातमी समजताच लिसाला धक्का बसला, पण दिलासाही मिळाला. लिसा म्हणते की, मी नर्स प्रॅक्टिशनरकडे पाहत होते आणि ती मला माझ्या लक्षणांबद्दल विचारत होती. गप्पा मारता मारता ती कम्युटरवर काहीतरी स्क्रोल करत होती आणि तिने अचानक तिचं बोलण थांबवलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही त्यावेळी बदलले होते.

लिसाने सांगितलं की, ती नर्स प्रॅक्टिशनर माझ्याकडे वळली आणि ती पूर्णपणे घाबरलेली दिसली आणि मला सांगितले की तिला डॉक्टरांना बोलावणे आवश्यक आहे, असं म्हणत ती पुढच्याच मिनिटाला खोलीतून बाहेर पळत गेली. तिने मला सुमारे 15 मिनिटे त्या खोलीत एकटं सोडलं आणि डॉक्टरांना सोबत घेऊनच ती रुममध्ये परतली. डॉक्टर आले आणि आपल्या वैद्यकीय भाषेत बोलायला सुरूवात केली आणि नंतर मला सांगितले की मला कॅन्सर नाही.”

परंतु, लिसाला कोणत्या चुकीमुळे कॅन्सर असल्याचं सांगण्यात आलं. त्यामागे कारण काय होतं. जर रिपोर्ट्सचा फेरआढावा घेण्यात आला नव्हता तर उपचार इतक्या घाईने का सुरू करण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -