Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyतजेलदार त्वचेसाठी ट्राय करा दही फेशियल

तजेलदार त्वचेसाठी ट्राय करा दही फेशियल

Subscribe

प्रत्येकाने स्वतःची आणि स्वतःच्या त्वचेची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सध्याचं धावपळीचं आयुष्य आणि थकवा याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सर्वाधिक परिणाम हा चेहऱ्यावर दिसून येतो. मानवाच्या चेहऱ्याची त्वचा ही इतर शारीराच्या त्वचेपेक्षा अधिक संवेदनशील असते. त्यामुळे तिची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकजण त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या पार्लर ट्रीटमेंट घेतात. मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी फेशियल कसं करायचं हे सांगणार आहोत.

घरच्या घरी फेशियल

9 Benefits of Using Yogurt on Your Face

- Advertisement -

 

  • क्लिंजिंग

फेशियलची पहिली पायरी म्हणजे क्लिंजिंग ही आहे. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त दही लागेल. थोडे दही हातात घेऊन चेहऱ्यावर लावा आणि नंतर मसाज करा. नीट मसाज केल्यानंतर, कापसाच्या मदतीने स्वच्छ करा.

- Advertisement -
  • स्क्रबिंग

यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही दही आणि तांदळाचे पीठ एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब करा.

  • मसाज

फेशियलमध्ये मसाज करणं खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही दह्यामध्ये बदामाचे तेल मिक्स करा आणि त्याने मसाज करा.

  • फेस पॅक

फेशियलमध्ये फेसपॅकला देखील खूप महत्वाचे आहे. फेस पॅकमध्ये दही, कॉफी हे मिश्रण एकजीव करून लावा. या फेस पॅकला 15 ते 20 मिनिट असेच ठेवा त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

 


हेही वाचा :

चमकदार त्वचेसाठी करा बिटाचा वापर

- Advertisment -

Manini