घरमहाराष्ट्रMaternal and Child Mortality: राज्यात दर दिवशी 34 बाळांचा गर्भातच होतोय मृत्यू

Maternal and Child Mortality: राज्यात दर दिवशी 34 बाळांचा गर्भातच होतोय मृत्यू

Subscribe

माता आणि बालमृत्यूंची आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारी समोर आल्यानंतर, धक्कदायक माहिती उघड झाली आहे. राज्यात दिवसाला सरासरी 34 बाळांचा मातेच्या गर्भातच मृत्यू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नागपूर: माता आणि बालमृत्यूंची आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारी समोर आल्यानंतर, धक्कदायक माहिती उघड झाली आहे. राज्यात दिवसाला सरासरी 34 बाळांचा मातेच्या गर्भातच मृत्यू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठ तासांत एक मातामृत्यू होत आहे. माहिती अधिकारामधून ही धक्कादायक माहिती सार्वजनिक विभागाच्या तपशिलातून समोर आली आहे. (Maternal and Child Mortality Every day 34 babies die in the womb in the state)

आकडेवारी काय सांगते?

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2023 या काळामध्ये 22 हजार 98 कमी वजनाच्या बाळाचे गर्भातचं मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 2 हजार 64 मातामृत्यू नोंदवण्यात आले. या आकडेवारीची दिवसाची सरासरी काढल्यास राज्यात सुमारे 34 कमी वजनाच्या बाळांचे मृत्यू तर 3 मातामृत्यू झाले आहेत.

- Advertisement -

राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान 13 हजार 635 उपजत मृत्यू तर 1 हजार 217 मातामृत्यू नोंदवण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणलेत. पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडून या आकडेवारीला दुजोरा देण्यात आला आहे.

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

अर्भकाची विकलांगता, रक्ताची कमी, विविध संक्रमण, अपघातासह इतरही कारणांमुळे गर्भातच उपजत मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्रत्येक मातेने गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन, त्याचा तंतोतंत पालन केल्यास उपजत व माता मृत्यूही कमी होऊ शकतात. त्यासोबतच प्रत्येक प्रसूती रुग्णालयात होणेही आवश्यक आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Maratha Reservation: सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल; जरांगेंचं सरकारसमोर नवं आव्हान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -