Tuesday, April 9, 2024
घरमानिनीBeautyचमकदार त्वचेसाठी जायफळ फेसपॅकचा करा वापर

चमकदार त्वचेसाठी जायफळ फेसपॅकचा करा वापर

Subscribe

भारतीय मसाल्यांचा वापर केवळ अन्न बनवण्यासाठीच नाहीतर अनेकदा चेहरा उजळवण्यासाठी देखील केला जातो. त्वचा सुंदर आणि डागविरहित होण्यासाठी जायफळ हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जायफळमध्ये त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

जायफळ आणि दूध

Home remedies for acne: Here's how nutmeg or jaiphal can cure pimples |  HealthShots

- Advertisement -

साहित्य :

  • 1 चमचा जायफळ पावडर
  • 1 चमचा कच्चे दूध

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम जायफळ पावडर आणि दूध एकत्र करुन त्याची चांगली पेस्ट करुन घ्यावी.
  • ही पेस्ट चेहऱ्यासह मानेवर 30 मिनिटांसाठी लावून ठेवा.
  • त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
  • जायफळ आणि दुधातील पोषकतत्त्वांमुळे चेहऱ्यांवरील बंद झालेले छिंद्रे उघडण्यास मदत होते.
  • यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
  • हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की करू शकता.
  • यामुळे तुमचा चेहरा चमकदार दिसेल.

हेही वाचा :

Summer Hair Care : उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

- Advertisment -

Manini