Friday, April 26, 2024
घरमानिनीKitchenMakar Sankranti 2024 : संक्रांतीसाठी लुसलुशीत तीळ पोळी

Makar Sankranti 2024 : संक्रांतीसाठी लुसलुशीत तीळ पोळी

Subscribe

तीळ गरम असतात त्यामुळे ते थंडीत मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मकर संक्रातीचा सण देखील एकमेकांना तीळ देऊन साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण तीळाच्या लाडवांसोबतच तीळ पोळी देखील बनवतात. तीळाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामध्ये व्हिटॅमीन्स , आयर्न, मॅग्नीशियम, कॅल्शियम, पोटॅशियम असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

साहित्य :

  • 3 वाटी तीळ
  • 1 वाटी गुळ
  • तूप
  • 1 वाटी गव्हाचे पीठ
  • 1/2 वाटी मैदा
  • 1 चमचा वेलची पूड

कृती :

Til Gul roti for Makar Sankranti. Sweet Chapati, poli made using Sesame seeds, jaggery 15933609 Stock Photo at Vecteezy

- Advertisement -

 

 

- Advertisement -
  • सर्वप्रथम गव्हाचे पीठ आणि मैदा चाळून घ्या. त्यानंतर त्यात चिमूटभर मीठ घालून कणीव (पुरण पोळीला असते तसे) मळून घ्या. 15-20 मिनिटे बाजूला ठेवावे.
  • आता तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या आणि थंड झाल्यावर त्याचे कूट करून त्यात किसलेला गुळ मिक्स करावा.
  • त्यानंतर तीळ आणि गुळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. या मिश्रणात वेलची पुड घालावी.
  • आता पूरळपोळी प्रमाणे पोळीमध्ये तीळा गूळाचे मिश्रण भरुन पोळी लाटून घ्यावी.
  • नंतर तव्यावर तूप घालून पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावी.
  • सर्व पोळ्या लाडून त्या गरम गरम सर्व्ह कराव्यात.

हेही वाचा :

Makar Sankranti 2024 : अशी बनवा भोगीची भाजी

- Advertisment -

Manini