घरक्राइमCall Forwarding Scam : चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका, अन्यथा तुमचे...

Call Forwarding Scam : चुकूनही ‘हा’ नंबर डायल करू नका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे

Subscribe

Call Forwarding Scam : केंद्र सरकारच्या टेलिकॉम विभागाने देशातील करोडो मोबाईल फोन वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दूरसंचार विभागाने वापरकर्त्यांना संशयास्पद कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये *401# डायल करून unknown number नंबरवर कॉल करण्यास सांगितले जाते. यामुळे, गुन्हेगारांना वापरकर्त्याच्या नंबरवर सर्व इनकमिंग कॉल करण्याची परवानगी मिळते. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार युजरच्या मोबाईल नंबरवर कॉल करून ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड मागून बँक खाते रिकामे करू शकतात.

दूरसंचार विभागाने मोबाईल फोन वापरकर्त्यांना अशा इनकमिंग कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. याआधीही ऑक्टोबरमध्ये *401# कॉल फॉरवर्डिंग घोटाळ्याची प्रकरणे समोर आली आहेत. गुन्हेगार ऑनलाइन डिलिव्हरी, बँक किंवा इतर सेवांचे एजंट म्हणून ओळखतात आणि वापरकर्त्यांना या नंबरवर कॉल करण्यास सांगतात. वापरकर्ते गुन्हेगारांच्या सापळ्यात अडकतात आणि हा विशेष USSD कोड टाकून, ते सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या unknown number वर त्यांच्या फोनवरील सर्व इनकमिंग कॉल्सना परवानगी देतात.

- Advertisement -

कशी होऊ शकते तुमची फसवणूक

स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या सिमकार्ड सर्व्हिस प्रोव्हाईडरचे कस्टमर केअर कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत.

- Advertisement -

सिमकार्डमध्ये तुमच्या बिघाड झाल्याचं सांगण्यात येते, त्यामुळे नेटकर्क आणि सर्व्हिस क्वालिटी खराब होत आहे असं संगतात.

*401# हा कोड शक्यतो असतो. या कोडसमोर ते एक फोन नंबट एंटर करायला सांगतात

ही समस्या सोडवण्यासाठी स्कॅमर तुम्हाला एक कोड एंटर करायला सांगतात.

यानंतर तुमच्या सिमवर येणारे सर्व कॉल आणि मेसेज तुम्ही एंटर केलेल्या नंबरवर फॉरवर्ड होतात.

असे कॉल फॉरवर्ड करणे थांबवा

जर वापरकर्ते सायबर गुन्हेगारांना बळी पडले आणि कॉल फॉरवर्डिंग चालू केले तर त्यांना त्यांच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते त्वरित बंद करावे लागेल.

यासाठी यूजर्सला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.

यानंतर, तुम्ही कॉल सेटिंग्जमध्ये जाऊन कॉल फॉरवर्डिंग पर्याय बंद करू शकता किंवा डीफॉल्ट सेटिंग्ज करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -