Sunday, April 14, 2024
घरमानिनीKitchenRecipe : आवळ्याचं चटपटीत लोणचं

Recipe : आवळ्याचं चटपटीत लोणचं

Subscribe

उन्हाळ्यात आपण कैरी, मिरची, लिंबाचे लोणचे बनवतो. आज आम्ही तुम्हाला आवळ्याचे लोणचं कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • आवळा
 • मोहरी
 • जिरे
 • लाल तिखट
 • तेल
 • मेथी दाने
 • धने
 • चवीप्रमाणे मीठ

कृती :

Amla pickle/ India gooseberry pickles

- Advertisement -

 

 • सर्वप्रथम 1 चमचा मोहरी , 1 चमचा जिरे, 1 चमचा धने एका कढईत घेऊन या मिश्रणाला मंद आचेवर भाजून घ्या. मोहरी तडतडल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
 • त्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे गरम तव्यावर एक मिनिटापर्यंत परतून घ्या. हा मसाला थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. याची बारीक पूड तयार करा.
 • त्यानंतर कढईत पाव कप मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचे एक कप बारीक तुकडे घाला आणि आवळ्याला पिवळसर रंग येईपर्यंत छान परतून घ्या.
 • गॅस बंद करून आवळ्याच्या फोडी थंड झाल्यावर त्यामध्ये तयार केलेले मसाले टाका. लाल तिखट आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका.
 • हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीत भरून ठेवा.
 • तयार आवळ्याचं लोणचं टेस्ट करा.

हेही वाचा :

सोप्या पद्धतीने बनवा नाचणीचे पापड

- Advertisment -

Manini