घरमनोरंजनNaach G Ghuma Teaser : ‘नाच गं घुमा’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Naach G Ghuma Teaser : ‘नाच गं घुमा’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Subscribe

स्त्रियांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर आणि गमतीजमतींवर आधारित ‘नाच गं घुमा’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नम्रता अन् मुक्ताची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली होती. आता या सिनेमाचा टीझरही समोर आलाय.

“प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते” या संवादाने टीझरची सुरुवात होते. हलका फुलका विषय तितक्याच मजेशी पद्धतीनं मांडण्यात आल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. नोकरी करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात कुटुंबासोबतच मदतनीस म्हणजेच कामवाली बाई देखील तितकीच महत्त्वाची असते… तिचं घरात असणं, नसणं…याभोवती कथानक फिरताना टीझरमध्ये दिसतं. मुक्ता , सारंग हे नवरा बायको आहेत. तर बालकलाकार मायरा त्यांची मुलगी आहे. तर नम्रता आवटे या सिनेमात कामवाली बाईच्या भूमिकेत आहे. यांच्या घरात घडणारे धम्माल किस्से ‘नाच गं घुमा’च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

- Advertisement -

 नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला चित्रपटात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, बालकलाकार मायरा वायकुळ यांनी भूमिका साकारल्या आहेत. टीझरमध्ये मायराचा गोड अंदाज सर्वाचं लक्ष वेधून घेतो. स्वप्नील जोशी, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे त्या सिनेमाची निर्मिती करत आहेत. ‘नाच गं घुमा’ या सिनेमाचं मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी लेखन केलं आहे तर परेश यांनी दिग्दर्शन केलं आहे.

जर एखादी स्त्री तिच्या घरची ‘राणी’ असेल, तर तिची कामवाली बाई तिच्यासाठी ‘परीराणी’च्या रुपात समोर येते असं या चित्रपटाचं आगळंवेगळं कथानक आहे. हा धमाल चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि व चि सौ कां’, ‘आत्मपॅम्प्लेट’ आणि ‘वाळवी’नंतर आता परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’कडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -