घरमुंबईLok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत -...

Lok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत – उद्धव ठाकरे

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाही इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे. त्यामुळे आज भाजपाने वापर करून फेकलेली लोकं आपल्याला येऊन भेटत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Lok Sabha election 2024 People who were used by BJP and trapped will come and meet us Uddhav Thackeray unmesh patil)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

- Advertisement -

भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करतो. तुमच्या-आमच्या भावना सारख्या आहेत. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे. मात्र उन्मेष पाटील यांनी प्रवाहाच्या विरोधात उडी मारली आहे. हा प्रवाह जनमताचा आहे. प्रवाह एकदा फिरला तर मोठमोठे ओंडके वाहून जातात. तशी भाजपची अवस्था होणार आहे. जे तिकडे गेले ते खोकेबाज म्हणून ओळखले जातात. जळगावातही गद्दारी झाली. सत्ता आहे तिथे लोक जातात. मात्र उन्मेष पाटील जनतेची सत्ता आणण्यासाठी आमच्याकडे आल आहेत. तुमचे आमचे विचार एक आहेत. तुमची फसगत झाली आहे. त्या फसगत करणाऱ्यांना निवडून द्यायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

हेही वाचा – Lok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत – उद्धव ठाकरे

- Advertisement -

जळगावमध्ये भगवा झेंडा फडकवायचाय (Want to hoist the saffron flag in Jalgaon)

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडत होतो. मागच्यावेळी तुम्ही उभे होता, त्यामुळे आम्हाला चिंता नव्हती. मात्र आता शिवछत्रपतींचा भगवा संसदेत जाणर आहे. आपलं ध्येय एक आहे. आपला झेंडा भगवा आहे. याआधी जळगावचा मतदारसंघ भाजपाला सोडला, आता त्या जळगावमध्ये भगवा झेंडा फडकला पाहिजे. कारण भाजपाने तुमच्यासारखी लोक वापरून फेकून दिली आहेत. या विरोधात आवाज उचलणारे आहात, शेपट्या घारणारे नाहीत, हे तुम्ही दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता आपण एकत्र विकासाची वाटचाल करू आणि जे आडवे येतील त्यांची वाट लावून पुढे जाऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -