घरदेश-विदेशLata Mangeshkar AI Voice: 'राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी' दिवंगत लता मंगेशकरांच्या...

Lata Mangeshkar AI Voice: ‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी’ दिवंगत लता मंगेशकरांच्या आवाजात AI चं गाणं

Subscribe

सोशल मीडियावर दिग्गज दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजात राम भजन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. AI ने ही कमाल केली आहे.

Ram Aayenge In Lata Mageshkar AI Voice: राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची वेळ जवळ आली आहे. अबालवृद्धांपासून सर्व या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. आता फक्त काही तास उरले आहेत. अवघ्या काही तासांतच रामलल्ला आपल्या घरी परतणार आहे. त्यामुळे या दिवसांत सध्या राम भजन मोठ्या प्रमाणात ऐकलं जात आहे. (Lata Mangeshkar AI Voice Ram Ayenge To Angana Sajaungi AI Song in Late Lata Mangeshkar s Voice)

सोशल मीडियावर दिग्गज दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजात राम भजन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. AI ने ही कमाल केली आहे. ‘राम आयेंगे’ हे गाणे लता मंगेशकर यांच्या AI आवाजात सादर करण्यात आले आहे. हे ऐकून अनेकजण भारावून गेले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोमने निधन झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by DJ MRA (@djmrasingh)

- Advertisement -

( हेही वाचा: Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला कार सेवेचा फोटो; ठाकरे गटाला प्रत्युत्तर )

- Advertisement -

ज्या AI वापरकर्त्याने दीदींच्या आवाजातील तो ऑडिओ युट्युबवर ( AI Related News) प्रदर्शिक केला आहे. त्यानं म्हटलं आहे की, हा नॉन कमर्शिअल व्हिडीओ आहे. AI आणि साऊंड इंजिनिअरींगच्या मदतीने आपण हा ऑडिओ तयार केल्याचे त्याचे म्हणणे आहे. यात संबंधित गायक, संगीतकार, यांचा आदर ठेऊनच ही कृती करण्यात आली आहे. यातून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवण्याचा उद्देश नाही, असे त्या मेकर्सनं स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा: Maratha Reservation : जरांगेच्या पदयात्रेचा आज दुसरा दिवस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आंदोलन थांबवण्याचे आवाहन )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -