Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthजेवणानंतर शतपावली करणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

जेवणानंतर शतपावली करणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Subscribe

आयुर्वेदानुसार ज्या-ज्यावेळी आपण जेवतो त्यानंतर शतपावली करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे. यामुळे मेटाबॉलिज्म सक्रिय होतो आणि आरोग्याला याचे काही फायदे होतात. (Shatapavli benefits after dinner)

पचनक्रियेसाठी फायदेशीर

- Advertisement -


जेवल्यानंतर कमीत कमी शंभर पावले चालण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असे केल्याने शरिरात पचनासंबंधित उत्तम सवयी विकसित होती. तुमचे जेवण व्यवस्थितीत पचण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

- Advertisement -


हाय ट्राइग्लिसराइड स्तर लठ्ठपणा आणि मेटाबोलिक सिंड्रोमचे कारण ठरु शकतो. यामध्ये हृदयासंबंधित आजार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शतपावली केल्याने ट्राइग्लिसराइडचा स्तर कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य राखले जाते.

ब्लड शुगर कंट्रोमध्ये राहते


जेवल्यानंतर शतपावली केल्यास ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात राहतो. टाइप-2 असलेल्या रुग्णांनी जेवल्यानंतर शतपावली केलीच पाहिजे.

वजन कमी होण्यास मदत


कॅलरीज बर्न करणे म्हणजे वजन कमी करण्याचा सर्वाधिक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही दररोज व्यायाम करु शकत नाही तर जेवल्यानंतर कमीत कमी 100 पावले चालण्याचा प्रयत्न करा. अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्ही प्रतिदिन 30 मिनिटे तरी वेगाने चाला.

उत्तम झोप लागते


रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी योग्य नव्हे. यामुळे समस्या उद्भवू शकतात. अशातच रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही आपल्या घरात किंवा जवळच फिरण्यासाठी जागा असेल तर तेथे शतपावली जरुर करा. त्यानंतर झोपा. यामुळे तुम्हाला उत्तम झोप लागेल.


हेही वाचा- दुपारच्या जेवणानंतर झोप येते? जाणून घ्या कारण

- Advertisment -

Manini