Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Fashion Short Height असलेल्या तरुणींनो शॉपिंग करताना असे आउटफिट्स घेणे टाळा

Short Height असलेल्या तरुणींनो शॉपिंग करताना असे आउटफिट्स घेणे टाळा

Subscribe

नेहमीच असे पाहिले जाते की, बहुतांश तरुणी आपल्या आउटफिट्समुळे खुप कंफ्युज असतात. अशातच आपल्यासाठी परफेक्ट आउटफिटची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन तुमची शॉर्ट हाइट लपली जाईल आणि तुम्ही उंच दिसाल.

खरंतर तरुणींना सर्वच आउटफिट्स सुंदर दिसतात. पण आपल्या बॉडी शेपनुसार आउटफिट्स निवडलात तर तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता. उंची कमी असेल तर तुम्ही पुढील काही आउटफिट्स घेणे टाळा.

- Advertisement -

-ओवरसाइज कपडे


भले सध्या ओवरसाइज कपड्यांचा ट्रेंन्ड आहे. पण तुम्ही उंचीने बुटके असाल तर शॉपिंग करताना ओवरसाइज कपडे घेणे टाळा. असे कपडे घेतल्यानंतर तुम्ही अधिक बुटके दिसू शकता. अशातच तुम्ही फ्लेयर्ड पँन्ट किंवा जीन्ससोबत कंबरे पर्यंत असणारा टॉप निवडू शकता.

- Advertisement -

-नी लेंथ स्कर्ट


जर तुम्ही गुडघ्यापर्यंत स्कट घालण्याचा ट्रेंन्ड आहे. पण तुम्ही उंचीने लहान असाल तर तसे स्कर्ट घेणे टाळा. यामुळे ही तुमची उंची अधिक लहान दिसेल. उंची वाढलेली दिसावी म्हणून तुम्ही गुडघ्यावर जाणारे ड्रेस किंवा एंकल लेंथ घ्या. यामुळे तुम्ही एकदम क्लासी दिसाल.

-लो वेस्ट पँन्टपासून दूर रहा


अशा प्रकारची पँन्ट सध्या खुप ट्रेंन्ड मध्ये आहे. उंची लहान असेल तर तुम्ही लो वेस्ट जीन्स किंवा कार्गो सारख्या पँन्ट घालणे टाळा. या व्यतिरिक्त तुम्ही हाय वेस्ट पँन्ट घालू शकता.


हेही वाचा- Fashion Tips : तुम्ही खूप बारीक आहात का ? तर वापरा या स्टाइलचे टी-शर्ट

- Advertisment -

Manini