वास्तूशास्त्रात घरातील सकारात्मक ऊर्जेवर विशेष लक्ष दिले जाते. तसेच वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तु शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. खरंतर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तुचे मोठं महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे घरातील कपाट, घराचा रंग, पूजा घर, घरातील घड्याळ इतकंच नव्हे तर घरामध्ये कोणत्या दिशेला कोणता फोटो लावायला हवा यांसारख्या प्रत्येक गोष्टीमागे वास्तुचे काही नियम आहेत.
घराच्या सजावटींमध्ये नेहमीच आपण वेगवेगळ्या फोटोंचा किंवा चित्रांचा वापर करतो. मात्र आपण घरामध्ये लावत असणाऱ्या फोटोंबाबत आधी संपूर्ण माहिती करुन घेणं महत्त्वाचे असते. कारण काही फोटोंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते , तर काही फोटो आपल्या घरासाठी शुभ असतात.असाच एक फोटो म्हणजे 7 घोड्यांचा फोटो, अलीकडे अनेकांच्या घरामध्ये 7 घोड्यांचा फोटो लावला जातो, मात्र अनेकजण हा फोटो योग्य दिशेला योग्य पद्धतीने लावत नाहीत त्यामुळे या फोटोमुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.
7 घोड्यांचा फोटो अशाप्रकारे लावा
- घरामध्ये 7 घोड्यांच्या फोटोंमध्ये घोडे नेहमी धावणारे असावे, तसेच त्या सर्वांचे तोंडही एकाच देशाला असावे.फोटोमधील 7 घोड्यांचा चेहरा प्रसन्न असावा.
- घरातील 7 घोड्याचा फोटो नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला लावावा. यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
- घराव्यतिरिक्त 7 घोड्याचा फोटो तुम्ही व्यपारच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये सुद्धा लावू शकता.
हेही वाचा :Vastu Tips : चुकूनही घराच्या ‘या’ दिशेला ठेवू नका कचऱ्याचा डबा; नाहीतर व्हाल कंगाल
7 घोड्यांचा फोटो लावल्याने होतात हे फायदे
- 7 घोड्याचा फोटो घरामध्ये लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. व्यक्तिला त्याच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते.
- कुटुंबातील व्यक्तिंचा समाजात मान-सन्मान वाढतो. तसेच त्याला अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात.
- व्यापाराच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये 7 घोड्याचा फोटो लावल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते.
टीप : my mahanagar कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही.