Saturday, December 2, 2023
घरमानिनीReligiousVastu Tips : घरात सकारात्मक ऊर्जा हवी? मग मीठ आणि तुरटीचे...

Vastu Tips : घरात सकारात्मक ऊर्जा हवी? मग मीठ आणि तुरटीचे ‘हे’ उपाय करा

Subscribe

प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सकारात्मक उर्जा हवी असते, घरातील वास्तुदोषामुळे घरातील सकारात्मकतेचा अभाव निर्माण होतो. यामुळे घरात आजारपण, कलह, कौटुंबिक मतभेद , आर्थिक चणचण भासणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

आपल्या देशात धार्मिक गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा निसर्ग निर्मित गोष्टींना फार महत्त्व असतं. निसर्गामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक लहान-मोठ्या समस्यांवर उपाय शोधू शकतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा हवी असते, घरातील वास्तुदोषामुळे घरातील सकारात्मकतेचा अभाव निर्माण होतो. यामुळे घरात आजारपण, कलह, कौटुंबिक मतभेद, आर्थिक चणचण भासणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी खडे मीठ आणि तुरटीचा वापर करू शकता.

खड्या मिठाचे उपाय

- Advertisement -
  • बारीक मिठापेक्षा खडे मीठ आपल्या आरोग्याबरोबरच वास्तूसाठी देखील जास्त उपयोगी आहे. खडेमीठ वास्तूमधील दोष दूर करण्यासाठी जास्त प्रभावकारी आहे. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून घर पुसून घ्या. असं नियमित दररोज केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
  • घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी घरातील प्रत्येक कोपऱ्यात एका काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ ठेवून द्या. दुसऱ्या शनिवारी ते मीठ टाकून पुन्हा दुसरे नवीन मीठ ठेवा. या उपायाने देखील घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
  • घरातील बाथरूम आणि शौचालयाची स्थिती ठीक नसल्यास तुम्ही बाथरूम आणि शौचालयामध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ ठेवून द्या. यामुळे तुमच्या घरातील बाथरूम आणि शौचालयातील दोष देखील दूर होतील.

 तुरटीचे उपाय

फिटकरी के फायदे और नुकसान - Fitkari (Alum) Benefits in Hindi

 

- Advertisement -

 

  •  तुरटीचे दोन प्रकार आहेत. पांढरी तुरटी आणि गुलाबी तुरटी. तुरटी देखील जंतुनाशक आहे. याचा उपयोग अनेक रोगांवर होतो. पण वास्तूच्या दृष्टिकोनातूनही तुरटी उपयुक्त आहे. तुरटी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते.
  • जर तुमचे मन कोणत्याही कामात लागत नसेल, अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्ही घरात एका काचेच्या प्लेटमध्ये तुरटीचा खडा ठेवा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
  • तुमच्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, मुलं सतत चिडचिड करत असतील तर, तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर तुरटीचा एक खडा ठेवा. याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.
  • घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी तुरटीला एका काचेच्या प्लेटमध्ये घराच्या खिडकी आणि दरवाजाजवळ ठेवा, यामुळे तुरटी तुमच्या घराबाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल.

हेही वाचा :

Vastu Tips : घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी?

- Advertisment -

Manini