Saturday, May 4, 2024
घरमानिनीHealthऑफिसमध्ये 'लंच' ला वेळ मिळत नाही, मग खा 'हे' पदार्थ

ऑफिसमध्ये ‘लंच’ ला वेळ मिळत नाही, मग खा ‘हे’ पदार्थ

Subscribe

ऑफिसमधील कामाच्या धावपळीत आपलं जेवणाकडे दुर्लक्ष होते. कधी नाश्ता तर कधी दुपारचं जेवणही राहून जाते. पण, अशा सवयीने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्याचा पहिला परिणाम म्हणजे अशक्तपणा आणि थकवा जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे आपण कितीही धावपळीच्या जगात जगत असलो तरी निरोगी शरीरासाठी सकस आणि संतुलित आहार करणे गरजेचे असते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थाबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल. तुम्हाला कामाच्या गडबडीत जर जेवायला वेळ मिळत नसेल तर खालील पदार्थ खाल्याने अशक्तपणा, थकवा या समस्या दूर होऊ शकतात.

- Advertisement -

सफरचंद – आपण कायमच हे ऐकत आलो आहोत की, दिवसातून एक सफरचंद खाल्याने डॉक्टरांना दूर ठेवता येते. सफरचंद खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते शिवाय एनर्जीही वाढते. तसेच सफरचंदात अँटी-ऑक्सीडेंट असतात. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका टाळतो.

केळी – केळ व्हिटॅमिन्स, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबरचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. यात अँटी-ऑक्सीडेंट्स आणि अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात. केळी हा संपूर्ण आहार मानला जातो. दिवसातून दोन ते तीन केळी खाल्याने पोट तर भरतेच शिवाय एनर्जीही मिळते.

- Advertisement -

ड्रायफ्रूट्स – ड्रायफ्रुट्समध्ये हेल्दी फॅट्स असतात. म्हणजेच जर तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन वाढविण्याचा विचार करत असाल तर ड्रायफ्रुट्सचे कमी प्रमाणात सेवन नक्की करा. याने फायदा होईल.

तुळस – झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवत असेल तर तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास ही तक्रार दूर होईल. तुळशीची पाने चहा किंवा पाण्यात उकळून प्यायलास अशक्तपणा, थकवा दूर होऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळेल.

डाळिंब – तुम्ही डाळिंबही खाऊ शकता. डाळींबाच्या सेवनाने आपल्याला एनर्जी मिळते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यावर डाळिंब हा रामबाण उपाय आहे.

 

 

 


हेही वाचा ; सावधान‍! किडनीसाठी ‘हे’ पाच पदार्थ आहेत घातक

 

- Advertisment -

Manini