घरक्राइमPune Crime : खरंच, 'कानून के हात लंबे होते है'; खून करुन...

Pune Crime : खरंच, ‘कानून के हात लंबे होते है’; खून करुन फरार झालेल्यास पुणे पोलिसांकडून 13 वर्षांनंतर अटक

Subscribe

घटना आहे 2011 या वर्षातील. पुण्यातील सेनापती सेनापती बापट रस्त्यावरील अंबिका सोसायटीतील नियोजित गृहप्रकल्पात राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव आणि बिट्टी ऊर्फ श्यामबाबू यादव हे दोघे सुरक्षा रक्षक होते.

पुणे : जुन्या हिंदी सिनेमात कानून के हात लंबे होते है हा संवाद असायचाच. हा संवाद पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर खरा ठरला आहे. कारण, खून करून फरार झालेल्या एका आरोपीस पुणे पोलिसांनी तब्बल 13 वर्षानंतर राजस्थानातून अटक केली. खून करुन पसार झालेला हा आरोप तेथे चणे, फुटाण विकण्याचा व्यवसाय करत होता हे विशेष. (Pune Crime  Indeed Kanoon Ke Haat Long Hote Hai After 13 years Pune police arrested the fugitive after murder)

घटना आहे 2011 या वर्षातील. पुण्यातील सेनापती सेनापती बापट रस्त्यावरील अंबिका सोसायटीतील नियोजित गृहप्रकल्पात राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव आणि बिट्टी ऊर्फ श्यामबाबू यादव हे दोघे सुरक्षा रक्षक होते. 15 मार्च 2011 रोजी रात्री अकराच्या सुमारास सिक्युरिटी एजन्सीतील पर्यवेक्षक बाबुराव मोघेकर तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याशी दोघांचा वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याचवेळी दोघांनी मोघेकर यांचा खून केला. त्यानंतर श्यामबाबू यादव पसार झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार – गुणरत्न सदावर्ते

चणे-फुटाणे विक्री करून करत होता उदरनिर्वाह

खून करणारा श्यामबाबू उत्तरप्रदेशातील चित्रकूट जिल्हयातील आहे. चतु:शृंगी पोलिसांचे पथक चित्रकुटमधील पहाडी गावात गेले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्याचा मोबाइल क्रमांक पोलिसांना मिळाला होता. तांत्रिक तपासात तो राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे समजले. तेव्हा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी श्यामबाबूचा शोध घेतला. पोलीस पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो राधेश्याम नावाने तेथे वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. झालवाड परिसरात तो चणे-फुटाणे विक्री करून उदरनिर्वाह करत होता.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Crime: ड्रग्ज, बलात्कार, मारहाण; 21 वर्षीय मुंबईतील तरुणीने सांगितला नाईट पार्टीचा संतापजनक अनुभव

या पुणे पोलिसांनी केली ही कामगिरी

खून करुन पसार झालेल्या आरोपी श्यामबाबू यादव पसार चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, हवालदार सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने, अस्लम अत्तार, गोकुळ घुले यांनी ही कामगिरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -