Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthMentally Strong : मेंटली स्ट्राँग होण्यासाठी लावा या सवयी

Mentally Strong : मेंटली स्ट्राँग होण्यासाठी लावा या सवयी

Subscribe

सध्या काही लोकांना खूप लवकर स्ट्रेस येतो. बहुतेक लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्ट्रेस घेतात. काही लोक भूतकाळातील गोष्टींचा विचार करतात. त्यांना कोणत्याही व्यक्तीशी बोलण्यात राग येतो. हे लोक स्वतःची इतरांशी तुलना देखील करतात. यामुळे हे लोक खूप तणावाखाली राहतात. पण अशा काही सवयी आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. काय आहेत या टिप्स जाणून घेऊयात.

कृतज्ञ व्हायला शिका
बहुतेक लोकांना आयुष्यातील नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची सवय असते. त्यामुळे कृतज्ञ व्हायला शिका आणि आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानायला शिका. दररोज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा दिवसभरातील चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. रोज सकाळी उठल्यावर देवाचे आभार माना की तुम्हाला नवीन सकाळ मिळाली आहे.

- Advertisement -

विचार कमी करा
अनेकांना छोट्या छोट्या गोष्टींचाअतिविचार करण्याची सवय असते. आपल्याला जर कोणी काही बोलले असेल तर त्या गोष्टीचा सतत विचार करत असतो. तुम्हाला ही गोष्ट मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवण्याचे काम करते. तुमचा यामुळे मौल्यवान वेळही वाया जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला गरजेनुसार महत्त्व दिले पाहिजे. या मदतीने तुम्ही स्वतःला टेन्शन फ्री ठेवू शकता.

स्वतःला वेळ द्या
आपण स्वत: सोबत सर्वात कमी वेळ घालवतो. दररोज थोडा वेळ द्या आणि तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर मंथन करा. चांगल्या मित्राप्रमाणे स्वतःशी बोला. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण मानसिकदृष्ट्याही तुम्हाला खूप मजबूत वाटेल.

- Advertisement -

दुर्लक्ष करा
प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही समान महत्त्व दिले तर ते तुमच्यासाठी चांगले नाही. असे बरेच लोक आहेत जे आपल्याबद्दल सतत वाईट बोलतात. सतत टोमणे मारतात. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वत: जास्त टेन्शन घेऊ नका. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. तुम्ही स्वतःला यामुळे आनंदी ठेवू शकाल.

अटॅचमेंट
आयुष्यात काही लोकांशी आपल्याला अटॅचमेंट होते. हे लोक जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा आपण स्ट्रेस घेतो. ते निघून गेल्यावर कधी कधी आपणही डिप्रेशनमध्ये जातो. या परिस्थितीत, स्वतःच्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisment -

Manini