Friday, September 29, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship ब्रेकअपचे 'हे' आहेत संकेत

ब्रेकअपचे ‘हे’ आहेत संकेत

Subscribe

रिलेशनशिप दीर्घकाळ टिकवून राहण्यासाठी दोन्ही पार्टनरकडून एकमेकांचा सन्मान करणे फार महत्त्वाचे असते. मात्र कधीकधी असे होते की, काही कारणास्तव कितीही प्रयत्न केला तरी नाते टिकले जात नाही. अशातच पार्टनर विभक्त होण्याचा किंवा ब्रेकअपचा निर्णय घेतात. तर असे कोणते संकेत आहेत जे सांगतात तुमचे नाते मोडणार आहेत.

एकमेकांना सन्मान न देणे
नात्यात एकमेकांना सन्मान न दिल्याने पार्टनरमध्ये प्रेम कमी होते. अशातच नात्याचा पाया सुद्धा ढासळला जातो.

- Advertisement -

मारहाण
नवरा-बायकोच्या नात्यात शारीरिक, मानसिक किंवा भावनात्मक असा कोणत्याही प्रकारचा हिंसा खपवून घेऊ नये. जर तुम्हाला पार्टनरकडून मारहाण किंवा शिविगाळ होत असेल तर अशा नात्यात न राहिलेलेच उत्तम.

एकमेकांवर विश्वास नसणे
रिलेशनशिप दीर्घकाळ टिकावे म्हणून एकमेकांवर विश्वास असणे फार महत्त्वाचे असते. मात्र नात्यात विश्वास नसेल तर तुमचे नाते मोडले जाऊ शकते.

- Advertisement -

न मिटलेले वाद
तुमच्या दोघांमध्ये एखादा वाद मिटलेला नसेल तर त्यावरून सतत वाद होऊ शकतात. अशातच न मिटलेले वाद सुद्धा तुमच्या ब्रेकअपचे कारण ठरू शकतात.

उपेक्षा
दोघांपैकी एक पार्टनर सातत्याने आपल्या पार्टनर बद्दल निष्काळजीपणा आणि त्यांच्या भावनांना समजून घेत नसेल तर दोघांमध्ये प्रेम कमी होते आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. अशातच दोघांमध्ये प्रेम,भावना नसेल तर नात्यात राहून काय फायदा नाही.

संवाद नसणे
नवरा-बायकोचे नाते तेव्हाच आनंदी असते जेव्हा एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातात. अशातच नात्यात जर संवाद नसेल तर नात्यात न राहिलेलेच बरे.


हेही वाचा- ‘हे’ संकेत सांगतात पार्टनरचे तुमच्यावर प्रेम नाही

 

- Advertisment -

Manini