Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionउन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत 'हे' फ्रॅबिक्स

उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत ‘हे’ फ्रॅबिक्स

Subscribe

उन्हाळ्यात कपड्यांची खरेदी करताना विशेष काळजी घेण्यात येते कारण वाढत्या तापमानामुळे पुरुष असो व स्त्री कपडे निवडताना ते हलके फॅब्रिक असलेले कपडे खरेदी करतात. असे कपडे उन्हाळ्यातील वातावरणासाठी अगदी कम्फर्टेबल असतात. तुमचा उन्हाळा पूर्णपणे आरामदायी असावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही योग्य फॅब्रिकची निवड करायला हवी.

उन्हाळ्याचे कपडे कसे असावेत ?

- Advertisement -

उन्हाळ्याचे कपडे श्वास घेण्यायोग्य असावेत कारण कपड्यांमधून हवा आरपार न झाल्यास त्वचेवर पुरळ उठण्याची शक्यता असते. एवढेच नाहीतर तर त्वचेला नियमित हवा न मिळाल्यास तुम्हाला गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटू शकते. दुसरं म्हणजे हलके कपडे. उन्हाळ्यातील कपडे श्वासघेण्यायोग्य आणि शोषक असण्यासाठी त्यांचे वजन हलके असणे फार महत्वाचे आहे. उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे कपड्यांवर जास्त प्रमाणात घाण आणि धूळ चिकटते. या कारणामुळे उन्हाळ्यात कपडे वारंवार धुवावे लागतात म्हणून सहजपणे स्वच्छ होतील अशा कपड्यांची निवड या दिवसात करावी.

फॅब्रिक कोणते निवडाल ?

- Advertisement -

कॉटन – कॉटन उन्हाळ्यासाठी सर्वात उत्तम फॅब्रिक आहे. सॉलिड कलर्सपासून प्रिंट्स आणि एमरॉयडरीपर्यंत सर्व प्रकारचे कपडे यात मिळतील. कॉटनची आणखी एक खासियत म्हणजे त्यापासून तुम्ही कोणत्याही प्रकारचा पोशाख बनवू शकता. ड्रेसपासून पॅन्टपर्यत ते कुर्त्यापासून साडीपर्यत विविध प्रकारचे आऊटफिट तुम्हाला कॉटनमध्ये मिळतात. हें केवळ हलके आणि हवेशीरच नसतात तर शरीरही थंड ठेवतात.

लिनन – उन्हाळाच्या कपड्यांसाठी लिनन आणखी एक पर्याय आहे. लिनन फॅब्रिक हलके आणि विणलेले असते, ज्याने शरीर हवेशीर आणि थंड राहते. इतर फॅब्रिक्सच्या तुलनेत लिनन थोडे महाग असते पण ते अतिशय एलिगंट असते. हे फॅब्रिक इतर कपड्याचा तुलनेत घाम शोषण्याच्या बाबतीत अतिशय उत्तम काम करते. कॉटनप्रमाणेच लिनन फॅब्रिकपासून भारतीय आणि वेस्टर्न असे दोन्ही प्रकारचे आऊटफिट तयार होतात.

रेयॉन – रेयॉन फॅब्रिक हे मॅनमेड फॅब्रिक आहे. रेयॉन हे कापूस, लाकडाचा लगदा आणि इतर नैसर्गिक किंवा कृत्रिम तंतू एकत्र करून बनविण्यात येते. ज्याने ते खूप हलके आणि हवेशीर असते. रेयॉन हे उन्हाळ्यातील टॉप, कुर्ते आणि शर्टसाठी योग्य फॅब्रिक आहे.

जर्सी – जर्सी फॅब्रिक कॉटन आणि सिथेंटीक फायबर्स एकत्र विणून तयार करण्यात येते. इतर फेब्रिक्सपेक्षा जर्सी स्ट्रेची असते. हे फॅब्रिक अतिशय शोषक आणि श्वास घेण्यायोग्य असते. यापासून तुम्ही टी-शर्ट टॉप, ड्रेसेस ट्युनिक्स असे आऊटफिट्स बनवू शकता.

 

 

 


हेही वाचा : High Heels : हाय हिल्स घातल्यावर पाय दुखतात? ‘हे’ करा उपाय

- Advertisment -

Manini