लाचखोर नरेशकुमार बहिरम अखेर निलंबित

लाचखोर नरेशकुमार बहिरम अखेर निलंबित

नाशिक : लाच प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तहसीलदार नरेशकुमार बहिरम याला निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी बहिरम याच्या निलंबनाचे आदेश काढले.

राजूर बहुला येथील मुरूम उत्खनन प्रकरणात संबंधित जमिन मालकाला बहिरम याने सव्वा कोटींचा दंड ठोठावला होता. या आदेशाविरुद्ध जमीनमालकाने उपविभागीय अधिकार्‍यांकडे अपील दाखल केले. त्यांनी हे प्रकरण फेरचौकशीसाठी पुन्हा बहिरम यांच्याकडे पाठविले. उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापरल्याचा जमीनमालकाचा दावा असल्याने स्थळनिरीक्षण करण्यात आले. त्यावेळी बहिरम याने संबंधितांकडे तडजोडीअंती १५ लाखांची लाच मागितली.

शनिवारी (दि. ५) रोजी त्याला लाच घेताना पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ६ ऑगस्ट रोजी सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर तो सलग ४८ तास पोलिस कोठडीत असल्याने नियमानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बहिरम याने जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा :

First Published on: August 9, 2023 9:26 PM
Exit mobile version