घरक्राइमलाचखोर बहिरमने धुळ्यात केला प्लॉट खरेदी, पत्नीच्या नावे मोठी एफडी

लाचखोर बहिरमने धुळ्यात केला प्लॉट खरेदी, पत्नीच्या नावे मोठी एफडी

Subscribe

नाशिक : लाचखोर तहसीलदार नरेशकुमार बहिरमच्या त्र्यंबकेश्वर, येवला आणि नाशिक तालुका तहसीलदार कार्यालयात प्राप्त तक्रारींची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने सुरू केली आहे. त्याच्या घरझडतीत सोने व चांदीचे दागिने सापडले असून, त्याने २०२२ मध्ये धुळे जिल्ह्यातील बोनगावात चार गुंठे प्लॉटची खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. विविध कार्यालयातील कामकाजावरुन बहिरमविरोधातील तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. बँकेत त्याच्या पत्नीच्या नावे ३ लाख ५० हजार रुपयांची मुदत ठेव आहे. त्याला मंगळवारी (दि.८) पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयात हजर केले जाणार आहे.

लाचखोर तहसीलदार बहिरम विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी विशेष न्यायालयाने दोन दिवस कोठडी सुनावली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बहिरमची कसून चौकशी सुरू केली. कोठडी संपल्यानंतर बहिरमला बुधवारी (दि. ९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने व बहिरमविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी सोमवारी (दि.७) त्र्यंबकेश्वर, येवला व नाशिक तालुका कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी केली. या पडताळणीत पथकास काही पुरावे हाती लागले आहेत. त्याने आणखी कोणाकडून लाच घेतली आहे का, त्याची माहिती पथक घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -