घरक्राइमबहिरमचा ट्रॅप संशयास्पद ?; लाच स्विकारली नाही, रक्कम गाडीत फेकली

बहिरमचा ट्रॅप संशयास्पद ?; लाच स्विकारली नाही, रक्कम गाडीत फेकली

Subscribe

नाशिक : तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी कर्मयोगीनगर, अंबड येथील मेरीडियम सोसायटीच्या पार्किंगमध्ये असताना तक्रारदाराकडून १५ लाख रुपये हातात घेतले नाही. त्यावेळी तक्रारदाराने बहिरम यांच्या कारमध्ये १५ लाख रूपयांची बॅग फेकली आणि त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नाशिक पथकाने त्यांना अटक केली. त्यामुळे लाचप्रकरण संशयास्पद आहे, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. राहुल कासलीवाल यांनी दिली.

अ‍ॅड. कासलीवाल म्हणाले की, तहसीलदार बहिरम रहात असलेला कर्मयोगीनगरमधील फ्लॅट बहीण सुरेखा तुकाराम बहिरम यांच्या नावे आहे. त्या शिक्षिका असून, त्यांनी कर्जाने फ्लॅट घेतलेला आहे. बहिरम यांच्या बँक स्टेटमेंटला या फ्लॅटचा पत्ता आहे. बहिरम यांनी धुळ्याला घेतलेल्या जमिनीचे सर्व आर्थिक व्यवहार खरेदीखतामध्ये दिलेले आहेत. अधिकार्‍यांना मिळकतीची माहिती शासनाला द्यावी लागते, त्यानुसार बहिरम यांनी माहिती दिलेली आहे. बहिरमच्या बँकखात्यावर पगाराचे पैसे आहेत. जामीन मिळावल्यावर दबाब टाकतील असे अनेक जामीन अर्जामध्ये म्हटले जाते. लाचप्रकरणाचा तपास गुन्हा दाखल होण्यापूर्वीच झालेला असतो. सापळापूर्व पंचनामा, सापळा पंचनामा आणि रिकव्हरी झालेली असते. दबाब टाकून पंचाला फितूर करता येत नाही. कारण पंच सरकारी नोकर आणि तपासी अधिकारीच असतो. या प्रकरणात सर्वसामान्य नागरिक साक्षीदार नसतात.

- Advertisement -

जमीन मालकाला १.२५ कोटी दंड तत्कालीन तहसीलदारांनी केलेला आहे. हे प्रकरण फेरचौकशीसाठी बहिरम यांच्याकडे आले होते. त्यामुळे बहिरम स्वत: साईटवर जावून आले होते. संबंधित जमीनमालकावर गौणखनिज चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात जमीनमालक निर्दोष सुटले होते. त्यामुळे दंड माफ करता येत नाही. कारण, क्रिमिनल केस व महसूल दंड लावण्याचे निकष वेगवेगळे आहेत.

बहिरम यांनी वाढीव दंड देवू नये, यासाठी ट्रॅप झाला आहे. लाचेची रक्कम बहिरम यांनी स्वत: हातात स्विकारली नाही. रकमेची बॅग गाडीत फेकण्यात आली आहे. त्यामुळे लाचप्रकरण संशयास्पद आहे. अनेक खटल्यांमध्येही जाणीवपूर्वक घरात किंवा गाडीमध्ये पैसे फेकण्यात आले आहेत. मूळ जमीनमालक बाफना असून, या जमिनीचे मुख्यत्यारपत्र तयार करण्यात आले आहे. मूळ मालकाची फिर्याद नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -