घरक्राइम'गुडलक'साठी तहसीलदार कार्यालयाची दिशा बदलण्याचा घाट; मात्र, बहिरम यांचीच लागली वाट

‘गुडलक’साठी तहसीलदार कार्यालयाची दिशा बदलण्याचा घाट; मात्र, बहिरम यांचीच लागली वाट

Subscribe

नाशिक : अधिकारयांची एखाद्या ठिकाणी बदली झाली की, बदलीच्या ठिकाणी संबधित अधिकारी आपल्या मनाप्रमाणे बदल करून कामकाज सुरू करतात. लाचखोर तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांने तर पदभार स्विकारताच तहसिलदारांचे जुन्या दालनाचे नुतनीकरणाचे काम सुरू केले. वास्तूशास्त्राचा संदर्भ घेत बहिरम यांने बसण्याची दिशाही बदलली. मात्र घडले भलतेच. ही दिशा बदलल्याचे सकारात्मक परिणाम होण्याऐवजी बहिरमच एसीबीच्या जाळयात अडकला अन सुसज्ज दालनात बसण्याचे त्याचे स्वप्न भंग झाले.

नरेशकुमार बहिरम यांची एप्रिल 2023 मध्ये नाशिक तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. नियुक्ती होताच बहिरम यांनी आपल्या केबिनचे नुतनीकरण करत पश्चिमेकडे असलेल्या कॅबिनचे द्वार पूर्वेकडे करण्याचा निर्णय घेतला होता. महिनाभरापूर्वीच या कामाला सुरुवात झाली होती. खास बैठकींसाठी अँटी चेंबर, फर्निचर, रंगरंगोटी, पीओपीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पश्चिमेकडील दाराची दिशा पूर्वेकडे करण्यात आली. विशेष म्हणजे महसूल सप्ताह सुरु होताच दोन दिवसांपूर्वी बहिरम पहिल्यांदाच या नवीन केबिनमधील खुर्चीत बसले तर खरे मात्र त्यानंतर शनिवारीच ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.

- Advertisement -

एका गौण खनिज प्रकरणात तक्रारदाराला बजावण्यात आलेला सव्वाकोटी रुपयांचा दंड कमी करण्यासाठी 15 लाखांची लाच मागितली आणि राहत्या घरी पार्किंगमध्ये त्यांनी ती स्वीकारली. अनेक महत्वाच्या फाईलही अडवून ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. दालनाच्या प्रवेशव्दाराची दिशाही पश्चिमेकडून पुर्वेकडे करण्यात आली. आता हा बदल त्यांनी कामकाजात सुधारणा आणण्यासाठी केला कि, स्वतःच्या भरभरासाठी हा भाग अलाहिदा मात्र याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी भलतचं घडल्याची चर्चा कार्यालय परिसरात सुरू आहे. दालनाची दिशा बदलली मात्र कामाची दशा न बदलल्याने अखेर तहसिलदार एसबीच्या जाळयात अडकल्याचेची परिसरात चर्चा आहे.

तहसिल कार्यालयात सारे कसे शांत शांत

एरव्ही तहसिल कार्यालयात एखादे काम घेऊन गेल्यानंतर फारशी दाद न देणारे कर्मचारी मात्र आता येणार्‍या नागरिकांना मात्र आता आदबीने कामाबाबत सहकार्य करू लागल्याचे चित्र नाशिक तहसिल कार्यालयात फेरफटका मारला असता दिसून आला. आलेल्या नागरिकाला काय काम आहे, कधी अर्ज केला अशी विचारणा करून लागलीच ते काम कोणत्या स्तरावर आहे याबाबत तातडीने तपासणी केली जात आहे. बहिरमवर कारवाई झाल्यानंतर कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये एकप्रकारे भितीचेच वातावरण दिसून येते. या भीतीच्या दबावाखाली कर्मचारी काम करत असून कामाशिवाय इतर कोणाशी अधिक बोलणे टाळत असल्याचे दिसून येते. अर्थात काही प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी मात्र नेहमीप्रमाणे आपले काम करत असल्याचेही दिसून येत आहे.

- Advertisement -

बहिरमच्या कारभाराची चौकशी सुरू

लाचखोर अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनने पकडल्यानंतर त्याच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनी उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समीतीची स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या प्रकऱणातील तथ्य तपासणार आहे. बहिरम यांच्या कामकाजाचा हेतू नेमका कसा होता हे तपासणार आहे.

हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -