Thursday, April 18, 2024
घरमानिनीBeautyओल्या केसांनी झोपणे चांगले का वाईट?

ओल्या केसांनी झोपणे चांगले का वाईट?

Subscribe

रात्री झोपण्यापूर्वी अनेक जणांना केस धुवून न सुकवता झोपण्याची सवय असते. मात्र, या सवयीमुळे केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केसगळतीपासून ते टाळूवर कोंडा वाढण्यापर्यंतच्या समस्या ओल्या केसांमुळे उदभवतात. तज्ज्ञांच्या मते, केस धुतल्यानंतर झोपणे अयोग्य मानण्यात आले आहे. खरं तर, ओले केस कमकुवत असतात. असे केस रात्री झोपताना उशीखाली आल्यास तुटण्याची अधिक शक्यता असते. यासह टाळूवर बॅक्टेरिया येण्याचीही समस्या जाणवू शकते.

ओल्या केसांनी झोपण्याचे दुष्परिणाम –

- Advertisement -

बुरशीजन्य संसर्ग –
ओल्या केसानी झोपल्याने टाळूच्या संसर्गाचा धोका वाढतो. बेडवर फ्लोरा फंगल असतात. परिणामी, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. असा लोकांना दम्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक जाते.

केस गळणे –
ओले केस कमकुवत असतात. अशा स्थितीत केस न सुकवता झोपल्याने केस गळण्याची समस्या उदभवते. परिणामी, केसांची मुळे कमकुवत झाल्याने त्याचा परिणाम केसांच्या मजबुतीवरही दिसून येतो.

- Advertisement -

टाळूला खाज सुटणे –
ओले केस घेऊन झोपल्याने केसांना खाज सुटते. याने केस कमकुवत होतात आणि केसांना फाटे फुटू लागतात. परिणामी, केसांमध्ये बेक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे खाज वाढते.

केस निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा –

मऊ पिलो कव्हर्स निवडा –
जर तुम्हाला ओल्या केसांनी झोपायचे असेल तर झोपण्यासाठी मऊ, सॅटिन स्लिक किंवा मलमलीच्या कापड असलेली उशी निवडा. यामुले केस तुटण्याचा धोका कमी निर्माण होतो शिवाय केसांच्या अन्य समस्या देखील टाळता येतात.

मायक्रो फायबर टॉवेल निवडा –
झोपण्यापूर्वी ओले केस सुकविण्यासाठी मायक्रो फायबर टॉवेलचा वापर करा. यासह दुसरं म्हणजे केस धुतल्यानंतर काही वेळ टॉवेलमध्ये गुंडाळवून ठेवा, असे केल्याने केसांमधील पाणी शोषले जाईल आणि संसर्गही कमी होईल.

केस मोकळे करणे आवश्यक –
केस धुतल्यानंतर केस मोकळे करणे आवश्यक असते. असे केल्याने केस गळणे टाळता येते आणि केसांची मुळे मजबूत होण्यास मदत मिळते.

खोबरेल तेल लावणे फायद्याचे –
खोबरेल तेलाच्या वापरणे केस गळती टाळता येते. यासाठी तुम्ही खोबरेल तेलाने टाळूची मालिश करायला हवी. असे केल्याने टाळूचा कोरडेपणा कमी होतो.

 

 


हेही वाचा : Hair Care Tips : केसांसाठी योग्य तेल शोधताय… मग हे वाचा

 

- Advertisment -

Manini