Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyकेसांच्या या लक्षणांवरून ओळखा तुमचे आरोग्य

केसांच्या या लक्षणांवरून ओळखा तुमचे आरोग्य

Subscribe

प्रत्येकाला सॉफ्ट अँड सिल्की केस हवे असतात. पण, बदलत्या आणि चुकीच्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना केस गळतीपासून ते केस पांढरे होण्याच्या समस्या जाणवत आहेत. तथापि, तज्ज्ञांच्या मते, केस आपल्या आरोग्याची स्थिती दर्शवितात. केस गळत असतील, केसांची वाढ थांबली असेल तर त्याची अनेक कारणे असू शकतात. याउलट, जर तुमचे केस चांगले असतील, वाढ उत्तमरीत्या होत असेल तर तुमच्या आरोग्याबाबतीत अनेक सकारात्मक संकेत देत असते.

या लक्षणांवरून ओळखा आरोग्य

- Advertisement -

केसांचे टेक्सचर आणि मजबुती – पौष्टीकतेची कमतरता किंवा आरोग्याच्या समस्या आपल्याला केसांवरून ओळखता येतात. तुमचे केस कोरडे किंवा सहज तुटत असतील तर केस बायोटिन, व्हिटॅमिन इ किंवा ओमेगा ३ फॅटी ऍसिडसारख्या व्हिटॅमिन्सची कमतरता दर्शविते. यासाठी आहारात अंडी, शेंगदाणे आणि चरबीयुक्त मासे यासारख्या पोषक द्रव्यांनी समृद्ध पदार्थ खायला हवेत.

केस गळणे – तुमचे काही केस गळणे हे सामान्य आहे. पण, जास्त प्रमाणात केसांची गळती किंवा त्यापलीकडे अचानक केस पातळ होणे आरोग्याच्या विविध परिस्थितीशी संबंधित असू शकतात. थायरॉईड, हार्मोनल इम्बॅलन्स, ताणतणाव आदींमुळे केसगळती होऊ शकते. यासाठी तज्ज्ञांची भेट अवश्य घ्या.

- Advertisement -

स्कॅल्पची स्थिती – स्कॅल्पची स्थितीदेखील आरोग्याबद्दल माहिती देऊ शकते. स्कॅल्पला खाज सुटणे किंवा लालसर होणे हे कोंडा, सोरायसिससारख्या परिस्थतीचे लक्षण असू शकते. स्कॅप्लवर स्ट्रेस, आहार, हार्मोनल इम्बॅलन्स यासारख्या घटकांचा परिणाम होऊ शकतो. यासाठी स्कॅल्पनुसार शॅम्पूची निवड करायला हवी.

अकाली पांढरे केस – केस पांढरे होणे हा वृद्धत्वाचा एक भाग असतो तर तिशीच्या आधी केस पांढरे होणे याला अकाली केस पांढरे होणे असे म्हणतात. केसांचा रंग निश्चित करण्यात आनुवंशिक घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. पण, व्हिटॅमिन बी 12 च्या कमरतेमुळेही केस पांढरे पांढरे होऊ लागतात.

केसांच्या वाढीत बदल जाणवणे – केस गळणे, केसांची वाढ मंदावणे अशी लक्षणे अलोपेशिया अरेटाची लक्षणे असू शकतात. तुम्हाला अशी काही समस्या जाणवत असेल तर त्वरित तज्ज्ञांशी बोलून योग्य ते उपचार करून घेणे आवश्यक आहे.

 

 

 


हेही वाचा : Frizzy Hair Tips : सकाळी उठल्यावर केस फ्रिझी होतात?

- Advertisment -

Manini