Monday, April 22, 2024
घरमानिनीBeautyFrizzy Hair Tips : सकाळी उठल्यावर केस फ्रिझी होतात?

Frizzy Hair Tips : सकाळी उठल्यावर केस फ्रिझी होतात?

Subscribe

केसांचा स्त्रियांच्या सौंदर्यात मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला स्लिक आणि चमकदार केस हवे असतात. पण , प्रत्यक्षात मात्र असे होत नाही. बऱ्याच महिलांची तर अशी तक्रार असते की, झोपेतून उठल्यावर त्यांचे केस फ्रिझी होतात. केसांचा गुंता खूप त्रासदायक असतो, कधी कधी केस इतके गुंततात की, ते सोडवणे कठीण होते. केसात कंगवा फिरवल्यावर केस सोडवताना केस भरपूर प्रमाणात गळतात.

केस तर गळतातच शिवाय यामध्ये बराच वेळही जातो. सकाळच्या घाईगडबडीत फिझी केस सोडविण्यासाठी तितकासा वेळही नसतो. तुमच्यासोबतही असे होत असेल तर पुढील टिप्स अवश्य फॉलो करा –

- Advertisement -

उशीचे कव्हर – ही एक छोटी आणि साधी सोपी टीप आहे. पण या टिपमुळे केसांमधील गुंता काढून टाकण्यास मदत होईल. तुम्ही जर आतापर्यत कॉटनचे पिलो कव्हर वापरत असाल तर ते सिल्कने बदला. कारण कापूस आणि इतर सामग्रीपासून बनविलेले उशांचे कव्हर घर्षण कमी करतात, त्यामुळे केसांमधील तेलही शोषून घेतले जाते. अशा परिस्थितीत केस कोरडे होऊ लागतात आणि त्यांचा गुंता होण्यास सुरुवात होते. पण, जर तुम्ही रेशीम अर्थात सिल्क उशीचे कव्हर वापरले तर केस फ्रिझी होण्याच्या समस्येपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळेल.

कंडिशनरचा वापर – जर तुम्हाला दररोज फ्रिझी केसांसहित उठावे लागत असेल तर तुमच्या रुटीनमध्ये कंडिशनरचा वापर सुरु करायला हवा. तुम्ही लिव्ह इन कंडिशनर रात्री केसांना लावून झोपू शकता. ही ट्रेक फॉलो केल्याने तुमची फ्रिझी केसांची समस्या काही प्रमाणात कमी होईल.

- Advertisement -

व्यवस्थित कंगवा करणे आवश्यक – केसांना नीट कंगवा न केल्यामुळे अनेकदा केसांची गुंतागुंत अर्थात फ्रिझी केसांची समस्या उदभवते. केसात व्यवस्थितपणे कंगवा फिरवल्यास केस विलग करणे सोपे होते. यासाठी नेहमी दात रुंद असलेला कंगवा वापरायला हवा. याशिवाय केसांचा गुंता सोडविण्यासाठी कायम केसांचे वेगवेगळे पार्ट करूनच केस सोडवायला हवेत. जर जास्त केस गुंतलेले असतील तर आधी बोटांच्या साहाय्याने केस वेगळे करा आणि त्यानंतरच कंगव्याचा वापर करा. केस सोडविताना कायम तळापासून सुरुवात करावी आणि नंतर वरच्या दिशेने जाणे महत्वाचे असते. असे केल्याने केस तुटत नाहीत आणि वेदनाही होत नाही.

केस मोकळे ठेऊन झोपू नये – अनेकवेळा आपण इतके थकतो की, केसात कंगवा न फिरविता केस मोकळे ठेऊनच झोपतो. असे केल्याने दुसऱ्या दिवशी केस फ्रिझी होतात. त्यामुळे केस रात्री बांधूनच झोपण्याचा प्रयन्त करा. तुम्ही झोपताना केसांची सैल वेणी किंवा बन सुद्धा बांधू शकता.

 

 

 


हेही वाचा : शॅम्पू करण्याआधी आणि नंतर केसांची अशी घ्या काळजी

 

- Advertisment -

Manini