Monday, December 4, 2023
घरमानिनीदातांसाठीच नाही, तर 'या' कामासाठी देखील करा टुथपेस्टचा वापर

दातांसाठीच नाही, तर ‘या’ कामासाठी देखील करा टुथपेस्टचा वापर

Subscribe

टुथपेस्ट म्हटलं की, त्याचा वापर हा फक्त दात साफ करण्यासाठीच होतो असे गृहीत धरले जाते. पण टुथपेस्टचा उपयोग इतरही काही कारणांसाठी महत्त्वाचा ठरु शकतो.

Sodium Fluoride vs. Stannous Fluoride | Which Is Best?

- Advertisement -
  • चांदीचे दागिने, चांदीची भांडी काळी पडल्यास त्यावर टुथपेस्ट लावावी आणि एका स्वच्छ कापडाने पुसून काढावे.
  • जर तुमच्या मुलांनी घरातील भिंतीवर काही रंगकाम केलेले असेल तर, थोडी टुथपेस्ट लावा आणि पुसून काढा.
  • जुन्या पियानोची बटणे पिवळी झाली असतील तर, त्यावर नॉन अ‍ॅब्रेसिव्ह टुथपेस्टचा वापर करा.
  • बुटाच्या रबरी सोलवरील डाग घालवण्यासाठी टुथपेस्टचा वापर करता येईल. त्याकरता ओल्या कपड्यावर टुथपेस्ट घेऊन ते घासून साफ करा.
  • कांदा किंवा लसूण चिरल्यावर हाताला त्याचा वास राहतो. तो वास घालवण्यासाठी हात टुथपेस्टने स्वच्छ करा आणि नंतर न विसरता हाताला मॉयश्चरायझर लावा.
  • जर तुमच्या गाडीच्या सीटवर पेनाचे डाग पडले असतील तर, त्यावर थोडी टुथपेस्ट लावून ती सुकू द्या. मग ओल्या कपड्याने ती घासल्यास डाग निघून जातील.
  • चामड्याच्या पर्सवरील किंवा जॅकेटवरील डाग घालवण्याकरतासुद्धा टुथपेस्ट लावून थोडावेळ सुकू द्या नंतर पुसून काढा.
  • चामड्याच्या बुटांवर जर स्क्रॅचेस पडले असतील तर त्यावर टुथपेस्ट लावून ते पुसून घ्या. असे केल्याने त्यावरील स्क्रॅचेस निघून जातील आणि शूज पहिल्यासारखे दिसू लागतील.

हेही वाचा :

कपडे प्रेस करण्यासाठी फॉलो करा ‘ही’ सोप्पी ट्रीक

- Advertisment -

Manini