Sunday, April 14, 2024
घरमानिनीBeautyदररोज मेकअप केल्याचे साईड इफेक्ट्स

दररोज मेकअप केल्याचे साईड इफेक्ट्स

Subscribe

मेकअप म्हटले की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. मेकअपमध्ये आयब्रो पेन्सिल, आयशॅडो, ब्लशर, लिपस्टिक असे विविध प्रोडक्ट्स बऱ्याच जणी दररोज वापरतात. काहींना तर दररोज मेकअप केल्याशिवाय जमत नाही. मात्र, नियमितपणे दररोज मेकअप केल्याने त्वचेवर अनेक गंभीर परिणाम होतात. चेहऱ्यावर सतत मेकअप लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे पेशींचे नुकसान होते.

मेकअप केल्याने स्त्रियांचे सौंदर्य वाढते हे स्वाभाविक आहे. पण, या नादात आपण स्वतःच आपल्या त्वचेचे नुकसान करून घेतो हे कित्येक महिलांच्या लक्षात येत नाही. लहान वयात दररोज मेकअप केल्यास भविष्यात त्वचेचे अनेक आजार उदभवण्याची शक्यता असते. मेकअप त्वचेसाठी कसा घातक ठरू शकतो जाणून घेऊयात,

- Advertisement -

मेकअप केल्याचे साईड इफेक्ट्स –

पिंपल्स – आजकाल महिलांना प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे पिंपल्स आणि मुरुमे. मेकअपच्या अतिवापरामुळे चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उदभवते. ज्याने चेहऱ्याची चमक हळूहळू नाहीशी होते आणि कालांतराने चेहरा खराब दिसू लागतो. कधी कधी फाऊंडेशन लावण्यापूर्वी आणि नंतर चेहरा स्वच्छ न धुतल्यामुळे त्वचेची छिद्र कमी होतात आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स बाहेर येऊ लागतात.

- Advertisement -

काळे ओठ – लिपस्टिकचा सततच्या वापरामुळे ओठ काळे होऊ लागतात. लिपस्टिकमध्ये असणारी हानिकारक केमिकल्स ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा दूर करतात. याशिवाय लिपस्टिकचा सततच्या वापरामुळे ओठांना इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. त्यामुळे लिप्स्टिकची निवड करताना ती उत्तम ब्रॅण्डची निवडा.

मुरूम – अनेकजणींची स्किन सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे मेकअपच्या सततच्या वापरामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवू लागते. रोज मेकअप केल्याने मेकअप प्रोड्क्टसमधील काही तुकडे त्वचेत जमा होतात, ज्यामुळे चेहेऱ्यावर मुरूम येऊ लागतात.

सुरकुत्या – मेकअपमध्ये असलेले पिगमेंट बॅक्टेरिया आणि प्रदूषित हवेत मिसळतात आणि त्वचेच्या कोलेजनचे नुकसान करतात. परिणामी, नवीन पेशी वाढण्यात अडचणी निर्माण होतात. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवते. त्वचेवर सुरकुत्या आल्याने तुम्ही म्हातारे दिसू लागता.

 

 

 

 


हेही वाचा : ब्युटी प्रोडक्ट्स असे ठेवा क्लीन आणि सेफ

 

- Advertisment -

Manini