Wednesday, May 8, 2024
घरमानिनीDiary'या' देशातील महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करण्याची मिळाली परवानगी

‘या’ देशातील महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करण्याची मिळाली परवानगी

Subscribe

स्पेनमध्ये सरकारने कॅटालोनिया प्रदेशात महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होऊन आंघोळ करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी महिला अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. ‘कॅटलन समानता कायदा 2020’ अंतर्गत आधीच मंजुरी दिली आहे. तरीही काही स्विमिंग पूलमध्ये महिलांना टॉपलेस आंघोळ करण्यास मनाई आहे. त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात या स्विमिंग पूलबाबत डझनभर तक्रारी येत होत्या. महिलांनी सांगितले की, जर पुरुष पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करत असतील तर महिलांना देखील तशी परवानगी द्यावी.

या कायद्यामागील विचार असा आहे की, प्रत्येक माणसाचा त्याच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे आणि तो त्याला आवडेल त्या पद्धतीने आंघोळ करू शकतो. ज्या महिलांना फुल बॉडी स्विम सूट घालायचा आहे किंवा ज्यांना बुरख्यासोबत ‘बुर्किनी’ अर्थात बिकिनी घालायची आहे, त्यांनाही यातून सूट मिळेल.

- Advertisement -

स्तनपानालाही मान्यता मिळाली 

स्पेनमध्ये आंघोळीव्यतिरिक्त, सरकारने महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याची परवानगी देखील दिली आहे. स्विमिंग पूल परिसरात असो किंवा इतर कोणतेही सार्वजनिक ठिकाणी, महिला आपल्या बाळाला मोकळेपणाने स्तनपान करू शकतात.

 आंघोळ किंवा स्तपान करण्यापासून रोखल्यास 4.50 कोटीचा दंड

नवीन कायद्यांचे पालन करण्याबाबत सरकार अत्यंत कडक आहे. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने एखाद्या नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी टॉपलेस आंघोळ करण्यास किंवा स्तनपान करण्यापासून रोखल्यास त्याला 4.50 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. टीव्ही, वृत्तपत्रे आणि रेडिओवर यासंदर्भात जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत.

- Advertisement -

 

‘फ्री निपल्स’ ग्रुपच्या दीर्घ मोहिमेला यश 

स्पेनच्या फेमिनिस्ट ग्रुप ‘मुग्रॉन्स लियुरेस’ (फ्री निपल्स) ने टॉपलेस आंघोळीबद्दल डझनभर तक्रारी केल्या होत्या. या ग्रुपच्या प्रवक्त्या मारिओना ट्रॅबल म्हणाल्या, “हा स्त्री आणि पुरुष समानतेचा मुद्दा आहे. पुरुष सर्व काही करू शकतात पण महिला करू शकत नाहीत, असे का? हे प्रकरण कुठपर्यंत जाईल माहीत नाही. मात्र सरकारने जे पाऊल उचलले आहे, त्याचा आम्हाला आनंदी आहे.

‘या’ देशात महिलांना टॉपलेस होण्याचा अधिकार

  • कॅनडाचे ओंटारियो, ब्रिटिश कोलंबिया, अल्बर्टा आणि क्यूबेक ही काही राज्ये आहेत. जिथे महिलांना सार्वजनिक ठिकाणी टॉपलेस उभे राहण्याचा आणि फिरण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, येथील वेगवेगळ्या राज्यांच्या कायद्यात थोडाफार फरक आहे.
  • अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यात, उच्च न्यायालयाने 1992 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष दोघांना समान अधिकार असल्याचा निर्णय दिला.

युरोपीय देशांमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याचा अधिकार

  • युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि अनेक युरोपीय देशांनी सार्वजनिकरित्या स्तनपान करण्याचा अधिकार बनवला आहे. यासाठी या देशांनी कायदे देखील तयार केले आहेत.
  • स्वीडन, नॉर्वे आणि आइसलँड सारख्या देशांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणे सामान्य आहे.
  • भारतात कामाच्या ठिकाणी स्तनपानाला ‘मातृत्व कायदा (2017)’ कायद्याद्वारे संरक्षित केले आहे. स्तनपानासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

‘या’ देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणे गुन्हा

बऱ्याच देशांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी स्तनपान स्वीकारले जाते आणि संरक्षित केले जाते. परंतु असे काही देश आहेत जिथे असे सार्वजनिक ठिकाणी सत्नपान केल्यास दंडनीय गुन्हा मानले जाते. सौदी अरेबियामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याची संस्कृती नाही. अशा सामाजिक नियमांना येथे प्रोत्साहन दिले जात नाही. तसेच काही आफ्रिकन देशांचाही असाच दृष्टिकोन आहे.


हेही वाचा – Diary: जेव्हा मनीषा कोइरालाने सांगितले घटस्फोटाचे कारण…

- Advertisment -

Manini