Saturday, April 27, 2024
घरमानिनीगुहेत घालवलेले ते ५०० दिवस...

गुहेत घालवलेले ते ५०० दिवस…

Subscribe

सोशल मीडियाच्या युगात तुम्ही कल्पना करु शकता की, एखादा व्यक्ती ५०० दिवस त्यापासून दूर राहू शकतो का? खरंतर असं झालं आहे. स्पेन मधील एथलीटने असे करुन दाखवले आहे. ही कामगिरी करणारी महिला ५० वर्षाची असून तिचे नाव बिएट्रिज फ्लेमिनी असे आहे. ती स्पेन मधील ग्रेनाडा येथील एका गुहेत तब्बल ५०० दिवस एकटी राहिली आणि त्यानंतर ती बाहेर आली. सध्या ती वैज्ञानिकांच्या निगराणीखाली आहे. तिच्या या कामगिरीला वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवण्यात आले आहे.

बिएट्रिज फ्लेमिनी २१ नोव्हेंबर २०२१ मध्ये गुहेत आली. त्यावेळी तिचे वय ४८ वर्ष होते. गुहेत राहत तिने आपले दोन वाढदिवस साजरे केले. बिएट्रिजच्या सपोर्ट टीमनुसार ५०० दिवसांदरम्यान जवळजवळ तिने ६०० पुस्तके वाचली आणि १ हजार लीटरपेक्षा अधिक पाणी प्यायली. परंतु हा प्रवास सोप्पा नव्हता.

- Advertisement -

बिएट्रिज हिने गुहेतील अनुभवांबद्दल सांगितले. तिने असे म्हटले की, एक वेळ अशी आली होती की, गुहेत किती दिवस राहत आहे हे मोजणे बंद केले होते. गुहेतील सर्वाधिक कठीण काळ तेव्हा होता जेव्हा मधमाश्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. तिने असे म्हटले की, गेल्या ५०० दिवसात केवळ मी पाणीच प्यायले. आता मला अंघोळ करायची आहे. परंतु वैज्ञानिकांनी मला आता असे करण्यास मनाई केली आहे.

- Advertisement -

गुहेतून निघाल्यानंतर बिएट्रिजन हिने सर्वात प्रथम नातेवाईक, सपोर्ट टीम यांची गळाभेट घेतली. बातचीत करताना तिने असे म्हटले की, जग बदलले गेले आहे. जेव्हा मी २१ नोव्हेंबरला गुहेत गेली तेव्हा अशा काही गोष्टी नव्हत्या ज्या आता आहेत. सध्या वैज्ञानिक तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या सपोर्ट टीमचे असे मानणे आहे की, बिएट्रिजने सर्वाधिक काळ गुहेत राहून रेकॉर्ड केला.

दरम्यान, आता पर्यंत अधिक दिवस गुहेत राहणाऱ्या गोष्टीवरुन बोलले जाते तेव्हा हा रेकॉर्ड ३३ चिली आणि बोलिवियन खाणीतील मजूरांच्या नावे आहे. ज्यांनी ६९ दिवस हे कॉपर गोल्डच्या खाणीत घालवले होते. २०१० मध्ये खाणीत भुस्खल्लन झाल्यानंतर तेथेच अडकले होते.

 


हेही वाचा: नववर नव्हे तर चक्क ‘या’ जमातीतील वडिलच करतात लेकीशी लग्न

- Advertisment -

Manini