Wednesday, May 15, 2024
घरमानिनीFashionविंटर लूकसाठी परफेक्ट स्टायलिश शॉल

विंटर लूकसाठी परफेक्ट स्टायलिश शॉल

Subscribe

थंडीचे दिवस सुरु झाले की अनेकांना कोणती फॅशन करावी असा प्रश्न पडतो कारण उन्हाळा असो वा हिवाळा स्टायलिश सर्वानाच दिसायचं असत. अशावेळी कडाक्याच्या थंडीत हमखास वापरण्यात येणारी शॉल तुम्हाला उबदार ठेवण्याचे काम करतेच पण, जर हीच शॉल तुम्ही थोडे हटके स्टाईलने घेतलीत तर तुम्ही हिवाळ्यातही स्टायलिश आणि कूल दिसाल. आज आपण अशाच काही स्टायलिश शॉल बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने तुमचे थंडीपासूनही रक्षण होईल आणि तुम्ही स्टायलिशही दिसाल.

सिल्वर शाईन असलेली शॉल
सिल्वर शाईन असलेली सिल्कची शॉल ही वजनाने हलकी असते. तुम्हाला क्लासी लूक हवा असेल तर सिल्वर शाईन असलेली शॉल बेस्ट ऑप्शन आहे. यात तुम्हाला विविध रंग सुद्धा मिळतात. जीन्स, स्कर्ट किंवा हाय नेक स्वेटरसोबत तुम्ही शॉल घेऊ शकता.

- Advertisement -

पश्मिना शॉल
पश्मिना शॉल क्लासी आणि रिच लूकसाठी उत्तम ऑप्शन आहे. विविध रंगामध्ये मिळणारी ही शॉल अतिशय सुंदर अशा भरतकामामुळे खूपच प्रसिद्ध आहे. मऊ आणि हलक्या कपड्यामुळे तिला स्टाईल करणेही सोप्पे असते. याशिवाय या शॉलचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास ही जास्त प्रमाणात उबदार असते.

- Advertisement -

बनारसी सिल्क शॉल
बनारसी सिल्क शॉलचे कपडा हा मऊ असतो. ज्याने बनारसी सिल्क शॉल हाताळणे खूप सोप्पे जाते. साडीवर किंवा साध्या सूटवर ही शॉल खूप शोभून दिसते. या शॉल मध्ये सुद्धा विविध रंग बाजारात उपलब्ध असतात.

काश्मिरी भरतकाम केलेली शॉल
आजकाल प्रत्येकालाच हटके दिसायचे असते. अशावेळी तुम्हाला काश्मिरी भरतकाम केलेली शॉल रॉयल लूक देण्यास मदत करेल. या शॉलमध्ये सुंदर भरतकाम केलेले असते शिवाय ही तुम्हाला गरम उबही देते. ही शॉल तुम्ही साडी, ड्रेस किंवा कोणत्याही सूटवर घेऊ शकता.

 

 

 


हेही वाचा ; डेनिम जॅकेट घालायच्या काही भन्नाट आयडिया

 

- Advertisment -

Manini