घरताज्या घडामोडीMaharashtra Weather : राज्यात काही भागांत अवकाळी पाऊस तर, मुंबई, ठाणे, कोकणात...

Maharashtra Weather : राज्यात काही भागांत अवकाळी पाऊस तर, मुंबई, ठाणे, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक आर्थिक समस्यांचा सामना या शेतऱ्यांना करावा लागतो आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक आर्थिक समस्यांचा सामना या शेतऱ्यांना करावा लागतो आहे. मात्र, केवळ अवकाळी पाऊसच नव्हे तर, काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. (Maharashtra weather update heatwave alert in mumbai kokan vidarbh marathwada maharashtra imd prediction)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील चेंबूर आणि पवई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून या ठिकाणी तापमान 37 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईच्या अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 4 आणि 5 मे रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तसेच, आज (4 मे) कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

देशातील पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. 5 मे रोजी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अंतर्गत कर्नाटक या भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

देशात एकिकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असला तरी, राज्याच्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, 5 आणि 6 मे 2024 रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात 5 आणि 6 मे 2024 रोजी वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 मे रोजी अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Maharashtra Weather : अवकाळी पावसाचा फटका; आंबा, भात शेतीचं नुकसान तर टोमॅटोही सडले

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -