घरठाणेWeather Update Today : काळजी घ्या! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

Weather Update Today : काळजी घ्या! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडतो आहे तर, काही भागांत प्रचंड उकाडा वाढला आहे. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडतो आहे तर, काही भागांत प्रचंड उकाडा वाढला आहे. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात तापमानाता प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (weather update today imd orange alert in mumbai thane kokan region)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज (17 एप्रिल) ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BMC : मुंबईत हिवताप, डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेची तयारी, आयुक्त गगराणींनी घेतली बैठक

गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. शिवाय, पुढील 24 तासात उकाड्यात आणखी वाढ होणार असून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे. उत्तर कोकणात कमाल तापमान 40 च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली. मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

राज्यात सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिणामी झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.


हेही वाचा – Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 9 मे रोजी सेवा सहा तासांसाठी पूर्णपणे बंद; कारण काय?

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -