घरपालघरमहिला पोलिसांची संख्या वाढली पाहिजे

महिला पोलिसांची संख्या वाढली पाहिजे

Subscribe

अशा स्थितीत विचारी समाज दिशाहिन देतो, असे प्रतिपादन फा. ज्यो अल्मेडा यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल वेरोणिका डाबरे यांचा सत्कार करण्यात आला.

वसईः स्त्रियांवर कुटुंबातही अत्याचार होतात. अत्याचारी स्त्रीया बोलत नाहीत. म्हणूनच महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी महिला पोलिसांची संख्या वाढली पाहिजे. महाराष्ट्र प्रगत राज्य समजले जाते. पण, महिलांसाठी पोलीस दलात 33 टक्के आरक्षण असले तरी 12 टक्के जागा भरल्या आहेत. पण, बिहारमध्ये 20 टक्के महिला पोलीस दलात आहेत, अशी माहिती सेवानिवृत्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी नंदाखाल येथे बोलताना दिली.

निर्भय महिला मंचाने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य फा. ज्यो अल्मेडा होते. बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या संचालिका शैला गोन्सालवीस, लता लोपीस यावेळी उपस्थित होते. महिलांवर अत्याचार होत असताना समाजाने बघ्याची भूमिका घेऊ नये. महिलांना रोड मॉडेल समजू नका. मुलींनी सायबर क्राईमपासून सावध रहावे, असे आवाहनही बोरवणकर यांनी पुढे बोलताना केले. नितीमानांना गुन्हेगार घाबरतात. आज संस्कृती, धर्म, राजकारण आणि समाजकारणात स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही. कायद्याचा धाक राहिलेला नाही. संविधान पुसण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा स्थितीत विचारी समाज दिशाहिन देतो, असे प्रतिपादन फा. ज्यो अल्मेडा यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल वेरोणिका डाबरे यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -