घरताज्या घडामोडीFood Poisoning : अंडा बिर्याणीमुळे 40 रेल्वे प्रवाशांना विषबाधा; नागपूर स्थानकातील घटना

Food Poisoning : अंडा बिर्याणीमुळे 40 रेल्वे प्रवाशांना विषबाधा; नागपूर स्थानकातील घटना

Subscribe

रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करताना जेवणाची चिंता अनेकांना असते. प्रवासात हवे तसे चांगले जेवण मिळाले नाही तर? यामुळे घरुनच प्रवासाला जाताना मुबलक खाद्यसाठा तयार केला जातो. पण काही प्रवाशी रेल्वेतील खाद्यपदार्थांना पसंती देतात. पण रेल्वे असो अथवा स्थानकातील अन्न खाल्ल्याने प्रवाशांना अनेकदा विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

नागपूर : रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करताना जेवणाची चिंता अनेकांना असते. प्रवासात हवे तसे चांगले जेवण मिळाले नाही तर? यामुळे घरुनच प्रवासाला जाताना मुबलक खाद्यसाठा तयार केला जातो. पण काही प्रवाशी रेल्वेतील खाद्यपदार्थांना पसंती देतात. पण रेल्वे असो अथवा स्थानकातील अन्न खाल्ल्याने प्रवाशांना अनेकदा विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नागपूर स्थानकात घडली आहे. नागपूर रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर बिर्याणी खाल्ल्यामुळे यशवंतपूर एक्स्प्रेसमधील (Yesvantpur Express) 40 प्रवाशांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Food Poisoning 40 passengers of yesvantpur express train after eating egg biyani from nagpur railway jan aahar stall)

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतपूर स्थानकातून निघालेली गाडी गोरखपूरकडे जात असताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशा स्थानकावरील जनआहारमधून या गाडीत अंडा बिर्याणीचे जवळपास 200 पार्सल पाठविण्यात आले होते. तसेच नागपूरच्या जनआहार स्टॉलवरुनही काही पार्सल या ट्रेनमध्ये पाठवण्यात आले होते. ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी ही बिर्याणी खाल्ली. त्यानंतर यशवंतपूर एक्स्प्रेसने इटारसी स्थानक सोडून गोरखपूरच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर अंडा बिर्याणी खाल्लेल्या प्रवाशांना त्रास जाणवायला लागला.

- Advertisement -

ट्रेनमधील जवळपास 40 जणांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. काही प्रवाशांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. हे सर्व प्रवाशी वेगवेगळ्या डब्यात होते. त्यामुळे सुरुवातीला कोणाला या घटनेचे गांभीर्य कळाले नाही. मात्र, संपूर्ण ट्रेनमधील प्रवाशी उलट्या करत समजताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रेल्वेतील प्रवाशांना उलट्या झाल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तातडीने घटनेची दखल घेण्यात आली. त्यामुळे कानपूर रेल्वे स्थानकात डॉक्टरांचे एक पथक यशवंतपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढले. या डॉक्टरांच्या पथकाने तातडीने सर्वजणांवर उपचार केले. त्यानंतर सर्वांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. आता या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून नागपूर तसेच बल्लारशा स्थानकावरील जनआहारमधील सर्व खाद्यपदार्थांची विक्री तातडीने थांबविण्यात आली आहे. या दोन्ही स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.


हेही वाचा – Harbour Railway : हार्बर मार्गावरील वाहतूक जवळपास अडीच तासांनी सुरळीत

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -