घरताज्या घडामोडीMaha Shivaratri 2024 : उपवासासाठी भगर खाताय तर सावधान! वाचा सविस्तर

Maha Shivaratri 2024 : उपवासासाठी भगर खाताय तर सावधान! वाचा सविस्तर

Subscribe

आज महाशिवरात्री असून मुंबईसह राज्यभरातील अनेक शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. प्रत्येक मंदिरासह गल्लोगल्ली असलेल्या शंकराच्या मंदिरात भाविकांनी मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच पूजाआर्चनेला सुरूवात केली आहे.

आज महाशिवरात्री असून मुंबईसह राज्यभरातील अनेक शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. प्रत्येक मंदिरासह गल्लोगल्ली असलेल्या शंकराच्या मंदिरात भाविकांनी मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच पूजाआर्चनेला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे महाशिवरात्रीला अनेक जण उपवास धरतात आणि उपवसाचे पदार्थ खातात. शक्यतो बहुतांश लोक महाशिवरात्रनिमित्त भगर खाण्याला पसंती देतात. पण, भगर खाणार असाल तर सावधान कारण मागील काही दिवसांपूर्वी भगर खाल्ल्याने बऱ्याच जणांना विषबाधा झाली होती. परिणामी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने जमिनीवरच त्यांना उपचार देण्यात आले होते. (maha shivaratri 2024 poisoning by eating bhagar what care should be taken)

भगर खाल्ल्यास कशी होते विषबाधा?

भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस (Aspergillus) प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होत असून, ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन (Fumigaclavine) यासारखी विषद्रव्ये (Toxins) तयार होतात. ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बूरशीच्या वाढीसाठी अनूकूल असते. अशा बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. परिणामी, नांदेड (Nanded) जिल्ह्यात 10 ते 12 गावातील नागरिकांना भगर खाल्यानंतर विषबाधा झाली. तसेच परळीतही भगर खाल्याने अनेकांना विषबाधा (Poisoning) झाली. उपवासाला अनेकजण भगर खाण्याला पसंती देत असल्याने आता प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

भगर खाताना अशी घ्या काळजी?

  • बाजारातून आणलेली भगर सर्वप्रथम निवडा आणि स्वच्छ करा.
  • बाजारात भगर खरेदी करताना शक्यतो पाकीटबंद भगर खरेदी करा.
  • ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका.
  • भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासून घ्या.
  • भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही.
  • जास्त दिवस भगर साठवू नका आणि जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.
  • शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
  • भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.
  • भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा.
  • भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत.
  • दोन ते तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात.
  • या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेतच करावे.

भगर विक्रेत्यांसाठी प्रशासनाच्या सुचना

  • विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी.
  • भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.
  • भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या.
  • मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये.
  • सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

अन्न व औषध प्रशासनाचे वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.


हेही वाचा – Mahashivratri 2024 : मंगळ, शनी दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ गोष्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -